Assembly Election 2024 : मुंबईतून उबाठा शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक विधानसभेत !

295
Assembly Election 2024 : मुंबईतून उबाठा शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक विधानसभेत !
Assembly Election 2024 : मुंबईतून उबाठा शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक विधानसभेत !
  • सचिन धानजी,मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रिंगणात यंदा विविध पक्षांकडून मुंबई महापालिकेचे तब्बल १७माजी नगरसेवक हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यातील जोगेश्वरी विधानसभेतून उबाठा शिवसेनेचे उमेदवार बाळा नर आणि भायखळा विधानसभेचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार हे विजयी झाले असून यंदाच्या विधानसभेतून मुंबई महापालिकेचे दोन माजी नगरसेवक विधीमंडळात पोहोचले आहेत.

शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आणि उबाठा शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्ष यांच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवारांची अधिकृत घोषणा केली गेली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) मुंबई महापालिकेचे १७ माजी नगरसेवक हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये शिवसेनेचे मुरजी पटेल, सुवर्णा करंज, भाजपाचे विनोद शेलार,उबाठा शिवसेनेचे मनोज जामसुतकर, श्रध्दा जाधव, प्रविणा मोरजकर, संदीप नाईक, समीर देसाई, बाळा नर, उदेश पाटेकर, संजय भालेराव, काँग्रेसचे आसिफ झकेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या राखी जाधव, मनसेचे संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, भालचंद्र आंबुरे आणि उबाठा शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजू पेडणेकर अशाप्रकारे विविध पक्षांचे माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले होते.

(हेही वाचा – BJP ला सर्वाधिक १,७२,९३,६५० मते; त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गटाला मिळाली मते)

या १७ नगरसेवकांपैंकी उबाठा शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभेचे उमेदवार बाळा नर हे १५४१ मतांनी विजयी झाले आहेत. नर यांनी शिवसेनेच्या उमेदवार मनिषा वायकर यांचा पराभव करून सन २०१७मध्ये मुंबईत निवडून आलेल्या नगरसेवकांपैंकी पहिला आमदार बनण्याचा मान मिळवला तर, सन २०१२च्या निवडणुकीत नगरसेवक असलेले आणि सन २०१७च्या निवडणुकीत ज्यांची पत्नी नगरसेविका म्हणून निवडून आली होती, ते माजी नगरसेवक मनोज जामसूतकर हे भायखळा विधानसभेतून विजयी झाले आहे. जामसुतकर यांनी माजी आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचा ३१,३६१ मतांनी पराभव केला आहे.

सन २०१९च्या विधानसभेमध्ये यामिनी जाधव, पराग शाह, दिलीप लांडे, रमेश कोरगावकर तसेच रईस शेख हे नगरसेवक आमदार बनले होते. तर त्या आधीच्या निवडणुकी म्हणजे सन २०१४च्या निवडणुकीत आशिष शेलार, सुनील प्रभू, मनिषा चौधरी, विद्या ठाकूर, अमित साटम, तमिल सेल्वन अशाप्रकारेमहापालिकेचे नगरसेवक हे आमदार बनले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.