Assembly Election 2024 : मुंबईतील पराभव धक्कादायक आणि अविश्वसनीय

382
Assembly Election 2024 : धक्कादायक आणि अविश्वसनीय मुंबईतील पराभव
Assembly Election 2024 : धक्कादायक आणि अविश्वसनीय मुंबईतील पराभव
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील ३६ विधानसभा मतदार संघातील चांदिवली विधानसभा यावेळी शिवसेनेकडे असली तरी विधानसभेत नसिम खान यांचा पराभव करणे अशक्यच असल्याचे बोलले जात होते. परंतु विद्यमान आमदार दिलीप मामा लांडे यांचा पराभव होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात होता, पण प्रत्यक्षात दिलीप लांडे यांनी नसिम खान यांचा तब्बल २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. केवळ चांदिवलीतील नसीम खान यांच्यासह भांडुपमधील रमेश कोरगांवकर आणि चेंबूरमधील प्रकाश फातर्पेकर तसेच वांद्रे पूर्व भागातील झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांचा पराभव हा सर्वांत धक्कादायक आणि अविश्वसनीयच मानला जात आहे.

प्रत्यक्ष मतदान निकालातून वेगळेच चित्र

मुंबईतील चांदिवली, भांडुप पश्चिम, चेंबूर आणि वांद्रे पूर्व भागातील निवडणूक निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात असून चांदिवली, भांडुप आणि चेंबूर विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव मानला जात होता, तर वांद्रे पूव भागात उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होईल असा अंदाज सर्वांकडूनच व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्ष मतदान निकालातून वेगळेच चित्र समोर आले. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Sanjay Raut भरकटले; मनसेमुळे उबाठाला फटका बसल्याचा अजब दावा!)

लांडे यांनी केला नसीम खान यांचा पराभव

चांदिवली विधानसभेत शिवसेनेचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे नसीम खान (Naseem Khan) यांच्यात प्रमुख लढत होती. मागील विधानसभा निवडणुकीत लांडे यांचा विजय केवळ ४०९ मतांनी झाला होता, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चांदिवली विधानसभा मतदार संघांत युतीचे उमेदवार उज्ज्वल निकम हे तब्बल ४३२४ मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठबळावर विद्यमान आमदार दिलीप लांडे यांचा पराभव गृहीत धरला जात होता, परंतु प्रत्यक्षात लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव तब्बल २० हजार ६२५ मतांनी केला. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या १ लाख ०२ हजार ९८५ मतांच्या तुलनेत नसीम खान यांना १ लाख ०४ हजार ०१६ मते मिळाली. तर लोकसभेत महायुतीचे उमेदवार निकम यांना ९८ हजार ६६१ मतदान झाले होते, त्या तुलनेत चांदिवलीत लांडे यांना १ लाख २४ हजार ६४१ एवढे मतदान झाले. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवाराला तब्बल २६ हजार मते अधिक मिळाल्याचे दिसून आले. (Assembly Election 2024)

कोरगावकरांचा शिवसेनेच्या अशोक पाटील यांनी केला पराभव

भांडुप पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान उबाठा शिवसेनेचे आमदार रमेश कोरगांवकर (Ramesh Korgaonkar) यांचा विजय निश्चित मानला जात होता, याठिकाणी प्रबळ आव्हान मनसेचे शिरीष सावंत यांचे मानले होते आणि शिवसेनेचे अशोक पाटील यांचे आव्हान मानले जात नव्हते. परंतु प्रत्यक्षात या निवडणुकीत रमेश कोरगांवकर (Ramesh Korgaonkar) यांना ७० हजार ९९० मते मिळाली तर शिवसेनेचे अशोक पाटील यांना ७७ हजार ७५४ मतदान झाले. तर मनसेचे शिरीष सावंत यांना केवळ २३ हजार ३३५ मतदान झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना सुमारे ५ हजारांचे मताधिक्य भांडुप मतदार संघातून मिळाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात असतानाच त्यातच स्वत: रमेश कोरगांवकर (Ramesh Korgaonkar) हे निवडणूक रिंगणात असल्याने त्यांना हरवणे कठिण मानले जात होते. परंतु तिथे माजी आमदार अशोक पाटील हे तब्बल ६७६४ मतांनी विजयी झाले आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – BJP ला सर्वाधिक १,७२,९३,६५० मते; त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गटाला मिळाली मते)

काते यांनी चेंबूरमध्ये विजय मिळवत फातर्पेकर यांना बसवले घरी

तर चेंबूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना लोकसभा निवडणुकीत तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश फातर्पेकर यांच्यासाठी अनुकूल मानला जात असतानाच शिवसेनेचे माजी आमदार आणि उमेदवार तुकाराम काते यांनी तब्बल १०हजार ७११ मतांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे प्रकाश फातर्पेकर यांचा पराभव अशक्य मानला जात असतानाच काते यांनी त्यांचा दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

झिशान सिद्दीकी यांना मोठा धक्का

तर वांद्रे पूर्व भागातील महायुतीचे उमेदवार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांचे मागील पाच वर्षांतील काम आणि वडिलांच्या हत्येची सहानूभूती यावर त्यांना मतदान होईल असे बोलले जात होते, पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे वरुण सरदेसाई हे तब्बल ११ हजार ३६५ मतांनी विजयी झाले. मनसेच्या तृप्ती सावंत यांनी १६ हजार ७४ मते मिळवूनही झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना सुमारे ११ हजारांनी पराभव पत्कारावा लागला. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.