Health Tips : पोळीला तूप लावून का खावे, वाचा सविस्तर

28
Health Tips : पोळीला तूप लावून का खातात, वाचा सविस्तर
Health Tips : पोळीला तूप लावून का खातात, वाचा सविस्तर

पोळीला तूप लावून खाण्याची परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे. गरमगरम पोळीला तूप लावून खाल्ल्याने काय फायदे होतात, माहित आहे का? जाणून घ्या.

(हेही वाचा –  I.N.D.I.A. Alliance : बिहारमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना हव्यात २२ जागा)

शरीरासाठी लाभदायक
पोळीला तूप लावून खाल्ल्याने शरीर मजबूत व्हायला मदत होते. तूप लावून पोळी खाल्ल्याने शरीराला कार्बोहायड्रेट आणि फॅट्सचा पुरवठा होतो.

हाडे मजबूत होतात
शरीराला कार्बोहायड्रेटसचा पुरवठा होत असल्याने हाडे मजबूत होतात.

त्वचेसाठी फायदेशीर
तुपामध्ये अँण्टी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात.यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

रोगप्रतिकारशक्तीवाढीसाठी
तुपामध्ये जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व डी, जीवनसत्त्व ए आणि अनेक पोषणतत्त्वांचा समावेश असतो.यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढण्यास मदत मिळते.

पोटाचे आरोग्य
तूप लावून पोळी खाल्ल्याने पचनास उपयुक्त असणारे एन्झाइम्स अॅक्टिव्ह होतात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर व्हायला मदत होते.
ह्रदयासाठी लाभदायक
तुपामध्ये मोनोसॅच्युरेटेड ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. हे घटक ह्रदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात.
कोलेस्ट्रॉल वाढीसाठी
तुपाच्या सेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते.
वजनवाढीवर नियंत्रण
तुपात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते.तूप लावून पोळी खाल्ल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.