Management Consultant Salary : मॅनेजमेंट कन्सल्टंटना भरगच्च पगार का मिळतो? असं काय करतात जे आपण करु शकत नाही?

57
Management Consultant Salary : मॅनेजमेंट कन्सल्टंटना भरगच्च पगार का मिळतो? असं काय करतात जे आपण करु शकत नाही?
Management Consultant Salary : मॅनेजमेंट कन्सल्टंटना भरगच्च पगार का मिळतो? असं काय करतात जे आपण करु शकत नाही?

व्यवसायात यश मिळवणं कठीण आहे. सर्व व्यावसायिक त्यांच्या स्पर्धकाला हरवून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत त्यांचे प्रोडकट्स आणि इतर सेवा पोहोचवण्यासाठी मार्ग शोधता असतात. लहान आणि नुकत्याच मोठ्या होणार्‍या व्यावसायिकांना असंख्य कामं करावी लागतात. तसंच त्यांना कित्येक अनेक आव्हानांनाही तोंड द्यावं लागतं. त्यासाठी ते व्यवस्थापन सल्लागार म्हणजेच मॅनेजमेंट कन्सल्टंटची मदत घेऊ शकतात. मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) नक्की काय आणि कशाप्रकारे काम करतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात…

(हेही वाचा – Rs 2000 Notes Withdrawal : २ हजार रुपयांच्या सगळ्या नोटा जमा झाल्या का ? आरबीआयने दिली माहिती)

मॅनेजमेंट कन्सल्टंटची मुख्य कामं
  • कंपनीचं अकाऊंट्स सांभाळणं
  • मानव संसाधने उपलब्ध करणं
  • टेक्निकल सहकार्य करणं
  • मार्केटिंग करणं

व्यावसायिकांना या सर्व गोष्टींचं समाधान स्वतःहून शोधण्याची गरज नसते. तर मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) हे व्यावसायिकांना या गोष्टींशी निगडित असलेल्या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करतात. प्रत्येक मॅनेजमेंट कन्सल्टंट हा विशिष्ट उद्योगामध्ये विशेषज्ञ असला तरीही, सगळेच मॅनेजमेंट कन्सल्टंट हे व्यावहारिक सल्ला आणि व्यावसायाशी संबंधित सेवा प्रदान करतात. मॅनेजमेंट कन्सल्टिंगचं काम करणार्‍या व्यक्तींना उच्च पगार का असतात हे खाली स्पष्ट केलं आहे. (Management Consultant Salary)

(हेही वाचा – Maharashtra Weather : येत्या पाच दिवसात तापमान कसं असणार ? वाचा IMD चा अंदाज काय?)

मॅनेजमेंट कन्सल्टंट

मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) हे प्रशिक्षित तज्ञ असतात. ते व्यवसायाशी संबंधित असलेल्या जटिल समस्या सोडवतात. त्यासाठी ते योग्य धोरणे आखतात. त्यांच्याकडे आपल्या क्लायंटच्या कंपनीची आर्थिक आणि ऑपरेशनल सिस्टीम सुधारण्याचं कौशल्य असतं. बहुतेक कन्सल्टंट त्यांच्या क्लायंट्सना त्यांच्या व्यवसायासंबंधित विशिष्ट समस्या सोडवण्यास मदत करतात. मॅनेजमेंट कन्सल्टंटचं काम हे स्ट्रॅटेजी कन्सल्टंटच्या तुलनेचंच असतं. मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) हे दीर्घकालीन तक्रारी आणि व्यवसाय प्रणालीवर परिणाम करणाऱ्या इतर समस्या सुधारण्यासाठी दीर्घकालीन धोरणे विकसित करतात. मॅनेजमेंट कन्सल्टंट हे आपल्या कंपनीला व्यवसायाशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यात आणि व्यवसायासाठी दीर्घकालीन नफा निर्माण करण्यास मदत करतात. (Management Consultant Salary)

बहुतेक कंपन्या या मॅनेजमेंट कन्सल्टंटना नियुक्त करतात कारण त्यांच्याकडे
  • उद्योगातील परिपूर्न माहिती
  • समस्या सोडवण्याची क्षमता
  • तार्किक वस्तुनिष्ठता

ही कौशल्ये असतात.

व्यावसायिकांना मॅनेजमेंट कन्सल्टंटची (Management Consultant) नियुक्ती करताना हव्या असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे त्यांची कंपनी आपलं बिझनेस ऑपरेशन कसं सुधारू शकते यावर इनपुट देणे होय.

(हेही वाचा – Central Railway च्या मुंबई विभागाचा प्रवास झाला आधिक सुरक्षित आणि आरामदायी; काय आहेत सुविधा?)

मॅनेजमेंट कन्सल्टंट हे आपल्या कंपनीसाठी
  • संशोधन लागू करतात
  • अंतर्गत डेटाचे विश्लेषण करतात
  • लोकांची मुलाखत घेतात
  • अहवाल तयार करतात आणि तो कंपनीकडे सादर करतात

मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) हे बहुतेक वेळेस आठवड्यातून कमीत कमी ५० तास काम करतात. ते आपला वेळ क्लायंट आणि इतर व्यावसायिकांशी फायदेशीर व्यावसायिक संबंध विकसित करण्यात घालवतात.

मॅनेजमेंट कन्सल्टंटची कर्तव्ये

मॅनेजमेंट कन्सल्टंट हे त्यांच्या कौशल्याचा आणि तंत्रज्ञानाच्या माहितीचा वापर करून आपल्या व्यावसायिक ग्राहकांना त्यांच्या पुढील गोष्टी सुधारण्यास मदत करतात:

  • बिझनेस प्रोसेस
  • स्टॅटर्जी
  • ऑर्गनाझेशनल डिझाइन

मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) हे त्यांच्या क्लायंटच्या सगळ्या स्तरावरच्या कर्मचार्‍यांना क्षमता, समस्या आणि पूर्वी अयशस्वी झालेले उपाय समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. ते मूळ कारणांचा शोध घेतात आणि कृतीशील नियोजनाद्वारे प्रपोजल तयार करतात.

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक न्यायालयाकडून प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश)

मॅनेजमेंट कन्सल्टंटना कार्यकारी अधिकार्‍यांना मार्गदर्शन करावं लागतं. त्याबरोबरच कंपनीचं कॉर्पोरेट मिशन पूर्ण करण्यासाठी, व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी आणि टेक्निकल पद्धतीने प्रपोजल तयार करण्यासाठी कंपनीच्या मॅनेजमेंटमधल्या लोकांना प्रशिक्षित करावं लागतं.

मॅनेजमेंट कन्सल्टंटना अनेकदा दीर्घकालीन कठीण समस्यांना तोंड द्यावं लागतं. समस्या सोडवण्यासाठी त्यांना त्यांच्या परस्परसंवादी आणि संवाद कौशल्यांचा वापर करावा लागतो. मॅनेजमेंट कन्सल्टंट (Management Consultant) हे त्यांच्या वेळेचा मोठा भाग कॉन्टिटेटिव्ह डेटाद्वारे फॉर्म्युलेटीव्ह रिझॉल्युशन्स तयार करण्यात घालवतात.

मॅनेजमेंट कन्सल्टंटचं (Management Consultant) काम कधीही एकसारखं नसतं. ते एखाद्या विशिष्ट समस्येवर कन्सल्टंट्सच्या टीमसोबत काम करू शकतात. ते स्वतंत्रपणे काम करू शकतात आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर विभाग व्यवस्थापकांशी समन्वय साधू शकतात.

◆मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या सामान्य कर्तव्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
  • व्यवसायावर परिणाम करणार्‍या समस्या सोडवण्यासाठी माहिती गोळा करणं
  • कंपनीची मॅनेजमेंट टीम आणि कर्मचार्‍यांची मुलाखत घेणं
  • साइटवरच्या पद्धती, कार्यपद्धती आणि उपकरणांचा वापर यांचं निरीक्षण करणं
  • महसूल, खर्च आणि इतर आर्थिक डेटाचं विश्लेषण करणं
  • नवीन कार्यपद्धती, व्यवसाय प्रणाली, पद्धती आणि ऑर्गनायझेशनल अरेंजमेन्टची शिफारस करणं
  • शिफारस केलेल्या बदलांसह कंपनीच्या मॅनेजमेंटला अहवाल प्रदान करणं
  • व्यावसायिक बदल केल्याने कंपनी कसे कार्य करत आहे, हे पाहण्यासाठी मॅनेजमेंट टीमचा पाठपुरावा करणं

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.