crystal point mall मध्ये तुम्ही काय काय खरेदी करु शकता? वाचा परिपूर्ण शॉपिंग गाइड!

60
crystal point mall मध्ये तुम्ही काय काय खरेदी करु शकता? वाचा परिपूर्ण शॉपिंग गाइड!
क्रिस्टल पॉईंट मॉल – मुंबई

क्रिस्टल पॉईंट मॉल हा मुंबईतला एक अद्वितीय मॉल आहे. तुम्हाला तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी या मॉलमध्ये ब्रँडेड रिटेल आउटलेट्सची भरभराट दिसेल. एवढंच नाही तर खाद्यपदार्थ आणि करमणुकीच्या इतर अनेक गोष्टी इथे उपलब्ध आहेत.

या मॉलमधल्या आऊटलेट्सपैकी एक ट्रू फिटनेस नावाचं फिटनेस सेंटर आहे. हे फिटनेस सेंटर युनिसेक्स आहे. म्हणजेच इथे पुरुष आणि महिला दोघांसाठीही जिम, योगा, स्पा मसाज सेंटर आणि शारीरिक तसंच मानसिक स्ट्रेंथ वाढवण्यासाठी बरंच काही आहे. (crystal point mall)

तसंच फर्निचर आणि घरासाठी लागणारं इतर सामान जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही क्रिस्टल पॉईंट मॉलमध्ये असलेला हुश स्लीप स्टुडिओ आणि सुपरमार्केट येथे खरेदी करू शकता. हा मॉल आणि इथे असलेले आऊटलेट्स अतिशय सुंदर आणि नीटनेटके आहेत. त्यामुळे या क्रिस्टल मॉलमध्ये खरेदी करताना तुम्हाला एक आनंददायी अनुभव मिळतो.

(हेही वाचा – hinduja hospital mumbai : हिंदुजा हॉस्पिटलबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? म्हणूनच हे आहे सर्वोत्कृष्ट रुग्णालय!)

क्रिस्टल पॉईंट मॉल, मुंबई हा मॉल सकाळी ०९.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू असतो.

मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर आहे. तसंच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानीही आहे. याव्यतिरिक्त मुंबई शहराची ओळख म्हणजे, हे शहर व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. युनेस्कोने जाहीर केलेल्या तीन जागतिक वारसा स्थळांपैकी एक मुंबई हे शहर आहे. तुम्ही इथे राहात असाल आणि इथले स्थायिक मुंबईकर असाल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. भारतातल्या सर्वांत वेगवान शहरांपैकी एक मुंबई शहर आहे.

मुंबईमध्ये खरेदी करायची असेल तर इथले मॉल्स प्रसिद्ध आहेत. क्रिस्टल मॉल प्रमाणेच आर सिटी मॉल, इन्फिनिटी मॉल, इनॉर्बिट मॉल, हाय स्ट्रीट फिनिक्स मॉल, ओबेरॉय मॉल, ग्रोव्हल्स मॉल, सिटी मॉल, कोरम मॉल आणि अट्रिया मॉल यांसारखेच अनेक मॉल्स आहेत. या सर्व ठिकाणी तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकता. एवढंच नाही तर इथल्या रेस्टोरंट्समध्ये अप्रतिम फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा आनंद घेऊ शकता. (crystal point mall)

कुलाबा, फ्लोरा फाउंटन यांसारख्या ठिकाणी तुमच्या बजेटप्रमाणे खरेदी करण्यासाठी कित्येक मॉल्स आणि दुकानं तुम्हाला दिसतील. याव्यतिरिक्त मुंबईतल्या पश्चिम रेल्वे स्थानकांपैकी दादर, वांद्रे, जुहू आणि लिंकिंग रोड ही ठिकाणंही खरेदी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहेत.

(हेही वाचा – IPL Mega Auction : १३ व्या वर्षी कोट्याधीश बनलेला वैभव सूर्यवंशी कोण आहे?)

तसंच मुंबईतलं उष्णकटिबंधीय हवामान असणारे काही समुद्रकिनारे, मुंबईच्या आसपास असलेले हिल स्टेशन्स हे पर्यटकांना आकर्षित करतात. मुंबई आणि मुंबईच्या आसपास असलेले निसर्गरम्य रिसॉर्ट्स हे तुमच्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर मुंबईच्या जवळपासच्या ठिकाणी एकदिवसीय सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर अशा निसर्गरम्य रिसॉर्ट्सचा नक्की विचार करा. या रिसॉर्ट्सपैकी काही डेला रिसॉर्ट्स, लेव्हल्स रिसॉर्ट, सिल्व्हरडोर रिसॉर्ट क्लब, द रिसॉर्ट, द रिट्रीट, क्षितिज रिसॉर्ट्स, मानस रिसॉर्ट्स अशी कितीतरी नावं तुम्हाला सापडतील.

तसंच तुम्ही ड्रिंक्सच्या शोधात असाल तर तमाशा, बायरूट, वसाबी बाय मोरिमोटो, टनाटन, पेशवा पॅव्हेलियन, द अर्थ प्लेट, फिफ्टी फाइव्ह ईस्ट, ईस्ट एशियन स्पाईस ट्रेल, १८० डिग्री, आर्क बार, मोस्टली ग्रिल्स यांसारख्या कित्येक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आणि बारची नावं तुम्हाला सापडतील. या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणात खाद्यप्रेमी जगभरात प्रसिद्ध असलेले स्वादिष्ट पदार्थ आणि ड्रिंक्स मिळतील. (crystal point mall)

तसंच स्वतःला ग्रूम करण्यासाठी तुम्ही ज्यूस सलून, सॅव्हियो जॉन परेरा, क्रोमाके इमेज सलून, लॅक्मे, जेन क्लॉड बेगुइन, बी-ब्लंट, मॅड अ व्हॉट, मोक्षम–द फ्यूजन स्पा, मेटा रिफ्लेक्सोलॉजी स्पा, द पाम्स स्पा, स्पा ला-व्हिए बाय L’Occitane, JW’s स्पा, क्वान स्पा, क्लब ओआसिस स्पा आणि वेस्टिन्स हेवन स्पा यांसारख्या कित्येक सलून आणि स्पाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.