काय आहे Pataleshwar Cave Temple चा भव्य इतिहास?

81
काय आहे Pataleshwar Cave Temple चा भव्य इतिहास?

पाताळेश्वर लेणी (Pataleshwar Cave Temple) हे महाराष्ट्रातल्या पुणे शहरातलं एक गुफा मंदिर आहे. या गुफा मंदिराला पाताळेश्वर महादेव मंदिर या नावानेही ओळखलं जातं. याव्यतिरिक्त या मंदिराला पंचालेश्वर मंदिर किंवा भांबुर्डे पांडव गुंफा मंदिर असंही म्हटलं जातं.

हे मंदिर महाराष्ट्रातल्या राष्ट्रकूट कालखंडाच्या ८व्या शतकामधलं खडक कापून कोरलेलं मंदिर आहे. महादेवाला समर्पित असलेल्या या मंदिरात एक गोलाकार नंदी मंडप आणि एक मोठा खांब असलेला मंडप आहे. या मंदिराच्या आसपासच्या परिसरात बाग आहे. याव्यतिरिक्त मंदिराच्या संकुलात इतरत्र नवीन मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या मंदिराच्या गुफांना बाहेरून पाहिल्यास असं दिसून येईल की, शतकानुशतके नैसर्गिक घटकांचे परिणाम कसे झाले आहेत. पुण्यातलं पाताळेश्वर मंदिर (Pataleshwar Cave Temple) हे भारताचं एक संरक्षित स्मारक आहे. या स्मारकाचं व्यापास्थापन भारतीय पुरातत्व विभागाकडून केलं जातं.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या १५०० रुपयांची तुलना केली ‘दारूच्या पेग’शी)

पाताळेश्वर मंदिर नक्की कुठे आहे?

पाताळेश्वर मंदिर लेणी (Pataleshwar Cave Temple) ही पुणे शहराच्या उत्तरेला आणि मुळा-मुठा नद्यांच्या संगमाच्या पश्चिमेला एका खडकाळ टेकडीवर आहे. या मंदिराच्या वास्तुशास्त्राचा उल्लेख ऐतिहासिक संस्कृत ग्रंथांमध्येही आढळतो. १९व्या शतकामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये या लेण्यांचा उल्लेख “पंचालेश्वर लेणी”, “पुण्याच्या भांबुर्डे लेणी”, “पांडू लेणी” किंवा “पंचालेश्वर मंदिर” असा केलेला आढळतो. पुणे शहराचा जसजसा विकास होत गेला, तसतसं हे मंदिर पुण्यातल्या शिवाजीनगरचा एक भाग होऊन राहिलं आहे. लेणी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर शहरीकरणाने वेढलेला आहे. पाताळेश्वर लेणी मंदिर हे मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर म्हणजेच ९३ मैल एवढ्या अंतरावर आहे.

पाताळेश्वर लेणी ही एक डोंगर फोडून कोरलेली लेणी आहे. या लेणीचं प्रवेशद्वार पूर्वेकडून सुमारे २० फूट एवढ्या लांब अंतरावर आहे. पूर्वी हा एक खोदलेला बोगदा होता पण तो कोसळला. या लेणीत गोलाकार आकाराचा नंदी मंडप आहे. हा मंडप मूळ खडकापासून कापून नंदी मंदिर म्हणून राखण्यात आला आहे. नंदी मंडपाच्या छताला आधार देण्यासाठी परिघाला बारा आणि आतून चार खांब अशाप्रकारे सोळा खांब उभारलेले आहेत. पूर्वेकडचे चार खांब आणि वरचं छत आता नष्ट झालेलं आहे.

(हेही वाचा – Malad Building Collapse: बांधकाम सुरू असताना २०व्या मजल्यावरुन ४ मंजूर कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू)

शिल्पकाराने नंदी मंडपाभोवती असलेली फरशी कापून सुमारे २ फूट खोल कुंडलाकार कुंड तयार केलं आहे. इथे नंदी एका पायावर बसलेला आहे. त्यांची ही मूर्तीही नैसर्गिक खडकात अखंडपणे कोरलेली आहे. तसंच पाताळेश्वर लेणीचा (Pataleshwar Cave Temple) आच्छादित भाग हा एक मोठा चौकोनी मंडपच आहे. पण हा मंडप नंदी मंडपासोबत असलेल्या खुल्या दरबारापेक्षा आकाराने थोडा लहान आहे. दर्शनी भागात आठ खांब आहेत. या खांबांच्या पाच रांगा आहेत ज्यामध्ये आठ फुटांची पायवाट आहे. गुहेच्या भिंतींवरही खांब आहेत. विशेष म्हणजे ही संपूर्ण लेणी एकाच खडकापासून कोरलेली आहे.

लेणीची गर्भगृहे पूर्वेकडे उघडी आहेत. या तीनही गर्भगृहांभोवती परिक्रमा मार्ग कोरलेला आहे. या संपूर्ण लेणीचं एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ती जमिनीपासून खालच्या पातळीवर आहे. म्हणूनच इथल्या मंदिराला पाताळेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. या लेणीच्या (Pataleshwar Cave Temple) मध्यवर्ती मंदिरात महादेव पांचालेश्वर लिंग खडकात कोरलेलं आहे. या मंदिरात असलेल्या मूळ मूर्ती हरवल्या आहेत. तरी इथे एका बाजूला ब्रह्मदेवाची, तर दुसरीकडे विष्णूची मूर्ती असण्याची शक्यता होती, असं म्हटलं जातं. १९व्या शतकाच्या मध्यापूर्वी कधीतरी पार्वतीची मूर्ती आणि गणेशाची मूर्ती इथे ठेवण्यात आली. याव्यतिरिक्त ज्या मूर्ती ओळखल्या जाऊ शकतात. त्यांपैकी सप्तमातृका, गजलक्ष्मी, त्रिपुरांतक, अनंतसायिन आणि लिंगोद्भव यांचा समावेश आहे. लेणीच्या परिसरात दुर्गामतेचे एक लहान मंदिरही आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.