Samsung इंडियाकडून एआय पॉवर्ड वैशिष्‍ट्ये असलेले ओडीसी ओएलईडी, व्‍ह्यूफिनिटी आणि स्‍मार्ट मॉनिटर्सची २०२४ लाइनअप लाँच

114
Samsung इंडियाकडून एआय पॉवर्ड वैशिष्‍ट्ये असलेले ओडीसी ओएलईडी, व्‍ह्यूफिनिटी आणि स्‍मार्ट मॉनिटर्सची २०२४ लाइनअप लाँच

ही लाइनअप नेक्‍स्‍ट-लेव्‍हल ओएलईडी अनुभव देते, तसेच नवीन प्रोप्रायटरी तंत्रज्ञान-सॅमसंग ओएलईडी सेफगार्ड+ सह बर्न-इनपासून संरक्षणाची खात्री देते. स्‍मार्ट मॉनिटर एम८ आणि ओडीसी ओएलईडी जी६ मधील एआयद्वारे समर्थित स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये उत्‍साहवर्धक मनोरंजनाची खात्री देतात, तर नवीन व्‍ह्यूफिनिटी मॉडेल्‍स कार्यस्‍थळांना अधिक सक्षम करतात. (Samsung)

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने बुधवारी ओडीसी ओएलईडी गेमिंग मॉनिटर, स्‍मार्ट मॉनिटर्स आणि व्‍ह्यूफिनिटी मॉनिटर्सची २०२४ लाइनअप लाँच केली. या श्रेणीमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी ग्राहकांसाठी नेक्‍स्‍ट-लेव्‍हल अनुभव आणि नवीन एआय क्षमता अनलॉक करतात. ओडीसी ओएलईडी जी६ आणि स्‍मार्ट मॉनिटर लाइनअप अधिक सुधारित मनोरंजन वैशिष्‍ट्यांसह मनोरंजनाचा आनंद अधिक उत्‍साहवर्धक करतात, तर एआायद्वारे समर्थित स्‍मार्ट मॉनिटर एम८ आणि व्‍ह्यूफिनिटी लाइनअप कनेक्‍टीव्‍हीटी वाढवत परिपूर्ण वर्कस्‍टेशनची खात्री देतात. (Samsung)

”ओडीसी ओएलईडी गेमिंग मॉनिटर, व्‍ह्यूफिनिटी आणि स्‍मार्ट मॉनिटर्सच्‍या आमच्‍या २०२४ लाइनअपच्‍या लाँचच्‍या माध्‍यमातून आमची ग्राहकांसाठी सर्वोत्तम अनुभवांना अनलॉक करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. उल्‍लेखनीय एआय तंत्रज्ञान व मल्‍टी-डिवाईस अनुभवाने समर्थित ओडीसी ओएलईडी गेमिंग मॉनिटर आणि स्‍मार्ट मॉनिटर्स अनुक्रमे व्हिज्‍युअल सर्वोत्तमता व सर्जनशीलतेला नव्‍या उंचीवर घेऊन जातील. जगातील पहिले प्रोप्रायटरी बर्न-इन संरक्षण तंत्रज्ञान ओएलईडी सेफगार्ड+ असलेला ओएलईडी गेमिंग मॉनिटर पल्‍सेटिंग हीट पाइपचा वापर करत इमेज बर्निंगला प्रतिबंध करतो,” असे सॅमसंग इंडियाच्‍या कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्‍यक्ष पुनीत सेठी म्‍हणाले. (Samsung)

ओडीसी ओएलईडी सिरीज : व्हिज्‍युअल एक्‍सलन्‍ससह नवीन बर्न-इन प्रीव्‍हेंशन वैशिष्‍ट्ये

ओडीसी ओएलईडी जी६ हा २७ इंच क्‍यूएचडी (२५६० x१४४०) रिझॉल्‍यूशन मॉनिटर आहे, ज्‍यामध्‍ये १६:९ अॅस्‍पेक्‍ट रेशिओ आहे. यामधील ३६० हर्टझ रिफ्रेश रेट आणि ०.०३ ms जीटीजी रिस्‍पॉन्‍स टाइम गेमर्सना गतीशील गेमप्‍लेशी संलग्‍न राहण्‍यास सोपे करते. (Samsung)

नवीन ओडीसी ओएलईडी मॉडेलमध्‍ये नवीन प्रोप्रायटरी बर्न-इन संरक्षण तंत्रज्ञान सॅमसंग ओएलईडी सेफगार्ड+ आहे. हे तंत्रज्ञान जगातील पहिलेच असून मॉनिटरमध्‍ये पल्‍सेटिंग हीट पाइपचा वापर करत बर्न-इनला प्रतिबंध करते. तसेच, डायनॅमिक कूलिंग सिस्‍टम जुन्‍या ग्रॅफाईट शीट पद्धतीच्‍या तुलनेत मॉनिटर गरम होण्‍यापासून पाचपट संरक्षण देते. मॉनिटर लोगो व टास्‍कबार यासारख्‍या स्थिर इमेजेसना देखील ओळखते आणि आपोआपपणे ब्राइटनेस कमी करत बर्न-इनपासून संरक्षण देते. (Samsung)

ओडीसी ओएलईडी जी६ अद्वितीय ओएलईडी पिक्‍चर क्‍वॉलिटीसह २५० नीट्सचे ब्राइटनेस (विशिष्‍ट) देतो, तर फ्रीसिन्‍क प्रीमियम प्रो जीपीयू आणि डिस्‍प्‍ले पॅनेलला एकत्र ठेवत व्‍यत्‍यय, स्क्रिन लॅग व स्क्रिन टीअरिंगला दूर करते. सॅमसंगचे नवीन ओएलईडी ग्‍लेअर फ्री तंत्रज्ञान रंगसंगती अचूक ठेवते आणि रिफ्लेक्‍शन्‍स दूर करते, तसेच इमेज शार्पनेस कायम ठेवत दिवसा प्रकाशात देखील सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देते. ओएलईडी-ऑप्टिमाइज्‍ड, लो-रिफ्लेक्‍शन कोटिंग ग्‍लॉस व रिफ्लेक्‍शनमधील ट्रेड-ऑफला दूर करते, ज्‍याचे श्रेय नवीन, विशेषीकृत हार्ड-कोटिंग लेयर आणि सरफेस कोटिंग पॅटर्नला जाते. (Samsung)

मॉनिटरमध्‍ये सुपर स्लिम मेटल डिझाइन आहे, जी मॉनिटरला विशिष्‍ट ओळख देते. कोअर लायटिंग+ मनोरंजन व गेमिंग अनुभवांना अधिक उत्‍साहित करते, तर अॅम्बियण्‍ट लायटिंग स्क्रिनशी जुळून जाते. एर्गोनॉमिक स्‍टॅण्‍ड अॅडजस्‍टेबल हाइट, तसेच टिल्‍ट व स्विव्‍हल सपोर्टसह दीर्घकाळापर्यंत कामकाज सत्रांना अधिक आरामदायी करते. नवीन ओडीसी ओएलईडी मॉनिटर हा सॅमसंगची ओएलईडी मॉनिटर मार्केट लीडरशीप विस्‍तारित करण्‍यासाठी नवीन डिवाइस आहे. सॅमसंगने पहिला ओएलईडी मॉडेल लाँच केल्‍याच्‍या एका वर्षाच्‍या आत ओएलईडी मॉनिटर बाजारपेठेत जागतिक विक्रीमध्‍ये अव्‍वल स्‍थान संपादित केल्‍यानंतर ओएलईडी मॉनिटर लाँच करण्‍यात आला आहे. या उपलब्‍धीमधून सॅमसंगची ओएलईडी मॉनिटर्सच्‍या स्‍पर्धात्‍मक क्षेत्रात झपाट्याने होत असलेली प्रगती दिसून येते, तसेच कंपनीच्‍या प्रोप्रायटरी ओएलईडी तंत्रज्ञानाचा फायदा घेणाऱ्या मॉडेल्‍ससह आपल्‍या गेमिंग मॉनिटर लाइन-अपमध्‍ये विविधता आणण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होते. (Samsung)

स्‍मार्ट मॉनिटर एम८ : अत्‍यंत सुस्‍पष्‍ट व्हिडिओ व ऑडिओसाठी एआय प्रोसेसिंग

अपडेटेड स्‍मार्ट मॉनिटर लाइनअप स्‍मार्टर मनोरंजन आणि उत्तम उत्‍पादकतेसाठी एकाच हबमध्‍ये परिपूर्ण मल्‍टी-डिवाईस अनुभव देते. अपग्रेडेड २०२४ मॉडेल्‍समध्‍ये एम८ (एम८०डी मॉडेल), एम७ (एम७०डी मॉडेल) आणि एम५ (एम५०डी मॉडेल) यांचा समावेश आहे. (Samsung)

अपग्रेडेड ३२ इंच ४के यूएचडी स्‍मार्ट मॉनिटर ए८ मध्‍ये एआयद्वारे समर्थित नवीन वैशिष्‍ट्यांसह एनक्‍यूएम एआय प्रोसेसर आहे, जे मनोरंजन अनुभवांना नव्‍या उंचीवर घेऊन जातात. एआय अपस्‍केलिंग जवळपास ४के5 पर्यंत कमी रिझॉल्‍यूशन कन्‍टेन्‍ट देते आणि अॅक्टिव्‍ह वॉईस अॅम्प्लिफायर प्रो एआयचा वापर करत युजरच्‍या कन्‍टेन्‍टमधील डायलॉग ऑप्टिमाइज करण्‍यासाठी आसपासच्‍या भागांमधील पार्श्‍वभूमी आवाजाचे विश्‍लेषण करते6. ३६० ऑडिओ मोड७ एम८ वर उपलब्‍ध आहे, जे गॅलॅक्‍सी बड्ससोबत संलग्‍न होत सर्वोत्तम साऊंड निर्माण करते. बिल्‍ट-इन स्लिमफिट कॅमेरा देखील सॅमसंग डेक्‍स8सह मोबाइल अॅप्‍लीकेशन्‍सच्‍या माध्‍यमातून व्हिडिओ कॉल्‍स सुलभपणे करण्‍याची सुविधा देतो. (Samsung)

ही नवीन वैशिष्‍ट्ये आधीच प्रभावी ठरलेल्‍या स्‍मार्ट मॉनिटर कार्यक्षमतेमध्‍ये अधिक वाढ करतात. स्‍मार्ट टीव्‍ही अॅप्‍स आणि सॅमसंग टीव्‍ही प्‍लस त्‍वरित स्ट्रिमिंग सेवा व लाइव्‍ह कन्टेन्‍टची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध करून देतात, ज्‍यासाठी पीसी बूट अप करण्‍याची किंवा इतर डिवाईसेसशी कनेक्‍ट करण्‍याची गरज भासत नाही. (Samsung)

एम७ ३२ इंच व ४३ इंच आकारांमध्‍ये उपलब्‍ध आहे, या मॉनिटरमध्‍ये ४के यूएचडी (३८४० x२१६०) रिझॉल्‍यूशन, ३०० नीट्सचे ब्राइटनेस (विशिष्‍ट) आणि ४ ms चे ग्रे टू ग्रे (जीटीजी) रिस्‍पॉन्‍स टाइम अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. एम५ २७ इंच व ३२ इंच आकारांमध्‍ये उपलब्‍ध आहे, या मॉनिटरमध्‍ये एफएचडी रिझॉल्‍यूशन (१९२० x१०८०), २५० नीट्सचे ब्राइटनेस (विशिष्‍ट) आणि ४ ms चे जीटीजी रिस्‍पॉन्‍स टाइम अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. (Samsung)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर….)

व्‍ह्यूफिनिटी सिरीज : सर्जनशीलता व सुलभ वापरामध्‍ये अधिक वाढ

क्रिएटर्स व व्‍यावसायिकांसाठी ऑप्टिमाइज करण्‍यासोबत जबाबदारीने डिझाइन करण्‍यात आलेल्‍या व्‍ह्यूफिनिटी सिरीजमध्‍ये व्‍ह्यूफिनिटी एम८ (एस८०यूडी व एस८०डी मॉडेल्‍स), व्‍ह्यूफिनिटी एस७ (एस७०डी मॉडेल) आणि व्‍ह्यूफिनिटी एस६ (एस६०यूडी मॉडेल्‍स) यांचा समावेश आहे.

अपडेटेड २०२४ व्‍ह्यूफिनिटी मॉनिटर्स रिसायकलिंग प्रयत्‍नांना मदत करतात, ते किमान १० टक्‍के रिसायकल केलेल्‍या प्‍लास्टिकपासून डिझाइन करण्‍यात आले आहेत आणि प्‍लास्टिक घटकांवर कोणत्‍याही केमिकल स्‍प्रेचा वापर करण्‍यात आलेला नाही. पॅकेजिंग सहजपणे वेगळे करता येण्‍यासाठी स्‍टेपल्‍सऐवजी ग्‍लूचा वापर करण्‍यात आला आहे. ईजी सेटअप स्‍टॅण्‍ड जलदपणे सेट-अप करता येतो, ज्‍यासाठी कोणतेही टूल्‍स किंवा स्क्रूची गरज भासत नाही, ज्‍यामुळे हा स्‍टॅण्‍ड सहजपणे सेट-अप करता येतो आणि व्‍ह्यूफिनिटीच्‍या आकर्षक डिस्‍प्‍लेचा आनंद घेता येतो. प्रत्‍येक २०२४ व्‍ह्यूफिनिटी मॉनिटरमध्‍ये एचडीआर१० आणि १ बिलियन रंगांचा डिस्‍प्‍ले आहे, ज्‍यामधून अचूक रंगसंगतीची खात्री मिळते, तसेच समाविष्‍ट करण्‍यात आलेली टीयूव्‍ही-राईनलँड-प्रमाणित इंटेलिजण्‍ट आय केअर वैशिष्‍ट्ये दीर्घकाळापर्यंत काम करताना डोळ्यांवरील ताण कमी करतात. (Samsung)

व्‍ह्यूफिनिटी एस८ २७ इंच व ३२ इंच स्क्रिन आकारांमध्‍ये येतो, ज्‍यामध्‍ये ४के यूएचडी (३८४० x२१६०) रिझॉल्‍यूशन, ६० हर्टझचे रिफ्रेश रेट आणि ३५० नीट्सचा ब्राइटनेस (विशिष्‍ट) आहे. तसेच सुलभ कनेक्‍टीव्‍हीटीसाठी यूएसबी हब आणि हाइट-अॅडजस्‍टेबल स्‍टॅण्‍ड आहे. एस८०यूडी मॉडेलमध्‍ये सुलभ कनेक्‍शनसाठी नवीन केव्‍हीएम स्विच आहे आणि दोन विभिन्‍न इनपुट डिवाईसेसमध्‍ये सहजपणे स्विच करता येतो, तसेच यूएसबी-सी पोर्ट वापरकर्त्‍यांना जवळपास ९० वॅट पॉवरमध्‍ये डिवाईसेसना चार्ज करण्‍याची सुविधा देते. (Samsung)

व्‍ह्यूफिनिटी एस८ २७ इंच व ३२ इंच स्क्रिन आकारांमध्‍ये येतो, ज्‍यामध्‍ये यूएचडी ४के (३८४०x२१६०) रिझॉल्‍यूशन, ३५० नीट्सचा ब्राइटनेस (विशिष्‍ट) आणि ६० हर्टझचा रिफ्रेश रेट आहे. व्‍ह्यूफिनिटी एस६ २४ इंच, २७ इंच व ३२ इंच आकारांमध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यामध्‍ये क्‍यूएचडी (२५६०x१४४०) रिझॉल्‍यूशन, १०० हर्टझचा रिफ्रेश रेट आणि २५० नीट्सचा ब्राइटनेस (विशिष्‍ट), तसेच यूएसबी हब आणि हाइट-अॅडजस्‍टेबल स्‍टॅण्‍ड आहे. एस६०यूडी मॉडेलमध्‍ये बिल्‍ट-इन केव्‍हीएम स्विच आणि यूएसबी-सी पोर्ट (जवळपास ९० वॅट चार्जिंग) देखील आहे. (Samsung)

किंमत व उपलब्‍धता

• ओडीसी ओएलईडी जी६ ब्‍लॅक रंगामध्‍ये ९२,३९९ रूपंयापासून उपलब्‍ध असेल.
• स्‍मार्ट मॉनिटर सिरीज १५,३९९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल.
• मॉनिटर्सची व्‍ह्यूफिनिटी श्रेणी २१,४४९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल.

सर्व मॉनिटर्स ५ जून २०२४ पासून सॅमसंग ई-स्टोअरवर उपलब्‍ध असतील. ग्राहक सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉप, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सर्व आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये मॉनिटर्स खरेदी करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://www.samsung.com/in/monitors/gaming/

ऑफर्स

ओडीसी ओएलईडी जी६ आणि स्‍मार्ट मॉनिटर सिरीज ५ जून ते ११ जून दरम्‍यान सॅमसंग ई-स्टोअरमधून खरेदी केल्‍यास नो-कॉस्‍ट ईएमआयसह जवळपास २७५० रूपयांच्‍या त्‍वरित कार्ट सूटमध्‍ये उपलब्‍ध असेल. सॅमसंग ई-स्‍टोअरमधून सॅमसंग मॉनिटर एम८ खरेदी केल्‍यास ग्राहकांना निश्चित सॅमसंग साऊंड बार मिळेल आणि ओएलईडी जी६ सह ग्राहकांना निश्चित सॅमसंग बड्स २ प्रो मिळेल. अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर या मॉडेल्‍सवर जवळपास १११०० रूपयांची सूट आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.