royal opera house : रॉयल ऑपेरा हाऊसचे काय आहे वैशिष्ट्ये?

62
royal opera house : रॉयल ऑपेरा हाऊसचे काय आहे वैशिष्ट्ये?

रॉयल ऑपेरा हाऊस (royal opera house) हे मुंबई ऑपेरा हाऊस म्हणून ओळखलं जातं. हे भारतातलं एकमेव ऑपेरा हाऊस आहे.

ऑपेरा हाऊस कुठे आहे?

पश्चिम मुंबईच्या चर्नी रोड नावाच्या रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या गिरगाव चौपाटीजवळ हे मुंबई ऑपेरा हाऊस आहे.

ऑपेरा हाऊसचं बांधकाम

१९०९ साली त्याच्या पायाभरणीचं काम करण्यात आलं आणि १९११ साली किंग जॉर्ज पाचवा याने त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्या इमारतीचा काही भाग बांधून झाला होता, पण १९१२ सालापर्यंत त्याच बरंचसं बांधकाम सुरूच राहिलं होतं. त्यानंतर १०१५ साली त्या इमारतीत बांधकामाची आणखी भर घालण्यात आली.

(हेही वाचा – Yuvraj Singh Biopic : युवराजवर ‘सिक्सर किंग’ या बायोपिकची घोषणा, कोण करणार युवराजची भूमिका?)

नाव कसं पडलं? आणि तिथे होणारे कार्यक्रम

हळुहळू त्या इमारतीला “ऑपेरा हाऊस” (royal opera house) म्हणून संबोधलं जायला लागलं. इथे नाटकं, संगीत कार्यक्रम आणि मग हळुहळू हिंदी चित्रपटांचं आयोजन सुरू झालं. १९७० आणि १९८० च्या दशकात हे ऑपेरा हाऊस बॉलीवूड चित्रपटांच्या शोसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनलं.

चित्रपटगृहे बंद पडायला लागली

१९८० सालच्या दशकामध्ये जसजसे होम व्हिडिओ प्लेअर लोकप्रिय होऊ लागले, तसतसे मुंबईतल्या चित्रपटगृहांना तोटा व्हायला लागला. पुढे १९९० सालच्या दशकामध्ये केबल टेलिव्हिजनची लोकप्रियता वाढायला लागली. त्यावेळी मुंबईतली चित्रपटगृहं प्रेक्षक मिळत नसल्यामुळे बंद पडायला लागली. १९९३ साली ऑपेरा हाऊसही बंद पडलं.

ऑपेरा हाऊसचा जीर्णोद्धार

ऑपेरा हाऊस (royal opera house) हे कित्येक वर्षं दुर्लक्षितच राहिलं. पुढे २००८ साली ऑपेरा हाऊसच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं. त्याच्या बाह्य जीर्णोद्धाराचं काम २०११ साली पूर्ण झालं. २०१६ साली या ऑपेरा हाऊसचं जीर्णोद्धार पूर्ण झाला.

ऑपेरा हाऊसच्या परिसरामध्ये दागिन्यांची दुकानं, धातूच्या वस्तूंची दुकानं आणि आयटी कंपन्या आहेत.

(हेही वाचा – kashi vishwanath express : किती आहे काशी विश्वनाथ एक्सप्रेसचे भाडे?)

सांस्कृतिक वारसा म्हणून पुरस्कार

२०१७ साली या ऑपेरा हाऊसला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार देण्यात आला होता.

ऑपेरा हाऊसची रचना

ऑपेरा हाऊस (royal opera house) हे युरोपियन आणि भारतीय वास्तूशैलींचं मिश्रण असलेल्या क्लासिकल डिझाइनमध्ये बांधलं गेलं आहे. कलकत्ता इथल्या मॉरिस बँडमन आणि त्यांचे भागीदार जहांगीर फ्रामजी काराका हे कोळसा दलालांच्या कंपनीचे प्रमुख होते. या दोघांनी मिळून ऑपेरा हाऊसच्या या डिझाइनची कल्पना केली होती. ही इमारत केनेडी आणि सँडहर्स्ट पुलांजवळच्या भाडेतत्त्वावरच्या जमिनीवर असलेल्या उत्कृष्ट इटालियन संगमरवर दगडाने बांधण्यात आली होती.

ससून कुटुंबाने ‘सॅन्स सोसी’ नावाच्या अप्रतिम हिऱ्यांच्या झूमरांची एक जोडी या ऑपेरा हाऊसला दान केली होती. ससून हवेलीत असलेलं एक झुंबर ऑपेरा हाऊसच्या फोयरमध्ये नेण्यात आलं. ऑपेरा हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारावर कवी, नाटककार, कादंबरीकार, साहित्यिक, कला आणि लोक संस्कृतीतल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून घुमटाचे आठ वेगवेगळे भाग समर्पित केले आहेत.

ऑपेरा हाऊसच्या आतल्या भागात आरामदायी लाकडी खुर्च्या असलेल्या बैठका आहेत. त्याच्या मागे आरामदायी बैठकीच्या २६ रांगा होत्या. जेणेकरून स्टॉल आणि ड्रेस सर्कलमध्ये बसलेल्या सर्व लोकांना स्टेजवरचं दृश्य स्पष्ट दिसू शकेल. ऑपेरा हाऊसच्या (royal opera house) छताची रचना अशा प्रकारे केली आहे की, बाल्कनीमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना स्टेजवरचा प्रत्येक शब्द किंवा गाणं ऐकता येऊ शकेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.