pizhichil : काय आहे पिज्हिचिल थेरपी आणि काय आहेत या थेरपीचे दुष्परिणाम?

92
pizhichil : काय आहे पिज्हिचिल थेरपी आणि काय आहेत या थेरपीचे दुष्परिणाम?

पिज्हिचिल थेरपी (pizhichil) हा अतिशय प्रसिद्ध उपचार आहे. या थेरपीला सर्वांगधारा, काया सेका किंवा थिलाधारा असेही म्हणतात. पिज्हिचिल हा मल्याळम शब्द आहे ज्याचा अर्थ आहे पिळणे. या वैद्यकीय पद्धतीत औषधी तेल कापडातून पिळून रुग्णाच्या अंगावर लावले जाते. यानंतर हलका मसाज केला जातो. या प्रक्रियेमुळे रुग्णाची चिंता, वेदना आणि तणाव दूर होतो. मेंदूला आराम देण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत आहे.

(हेही वाचा – Rajabai Clock Tower : मुंबईतील फोर्ट इथल्या राजाभाई टॉवरचं काय आहे वैशिष्ट्य?)

पिज्हिचिल (pizhichil) प्रक्रियेत काही औषधी तेलांचे मिश्रण घेऊन ते गरम करुन वापरतात. या तेलाची धार अंगावर सोडली जाते आणि मालिश केली जाते. पूर्वीच्या काळात, राजे आणि महाराजांना या प्रक्रियेने मालिश केले जात असे. थोडक्यात पूर्वी उच्चभ्रू लोक या थेरपीचा उपयोग अधिक करायचे. या थेरपीमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकले जाऊ शकतात.

पिज्हिचिल थेरपी करण्यापूर्वी, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी केली जाते. या प्रक्रियेमुळे रुग्णाला कोणतेही नुकसान होणार नाही, याची खात्री करण्यासाठी ही चाचणी केली जाते. या थेरपीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे ६० ते ९० मिनिटे लागतात.

(हेही वाचा – tadoba national park : ताडोबा अभयारण्यात जाणार आहात? मग आधी हा लेख वाचा)

कोणत्याही गोष्टी जसा फायदा असतो तसे नुकसानही असते. या थेरपीचे अनेक फायदे आहेत. पण थोडे दुर्लक्ष केले तर या थेरपीमुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. ही थेरपी घेतल्यानंतर त्वचेची जळजळ आणि खाज सुटू शकते. अनेकांना थेरपी घेतल्यानंतर तीव्र थकवा जाणवतो.

काही प्रकरणांमध्ये, थेरपी घेतल्यानंतर आवाजात बदल होतो. रुग्णाचा आवाज कर्कश होऊ शकतो. थेरपी घेतल्यानंतर, काहींना सांधेदुखी आणि सूज येऊ लागते. ही थेरपी घेतल्यानंतर उलट्या, रक्तस्त्राव आणि ताप येऊ शकतो. त्यामुळे ही थेरपी फक्त आणि फक्त आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार केली पाहिजे. फसव्या जाहिरातीला बळी पडू नका. (pizhichil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.