Whatsapp Feature : झुकरबर्गने फेसबुकवरून सांगितले व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर! काय आहे ते जाणून घ्या

झुकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे या फिचरची घोषणा केली आहे. त्याने सांगितले की,"आजपासून तुम्ही एकाच व्हॉट्सअ‍ॅप खात्याचे चार फोनवर लॉग इन करू शकता" या नव्या फिचरमुळे वापरकर्त्यांची डिव्हाईस बदलण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. लोकांच्या या त्रासाबाबत अनेकदा तक्रारी आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

45
Whatsapp

आपल्या आयुष्यात सोशल मीडिया आणि त्यात ही व्हॉट्सअ‍ॅपचे किती महत्त्वाचे स्थान आहे हे वेगळे सांगायला नको. याच Whatsapp ची मूळ कंपनी असलेल्या मेटाचा सर्वेसर्वा असलेल्या मार्क झुकरबर्गने एका नव्या फिचरची घोषणा केली आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! उन्हाळ्यात चाकरमान्यांसाठी धावणार विशेष गाड्या, पहा वेळापत्रक)

झुकरबर्गची ती पोस्ट होतेय व्हायरल

झुकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे या फिचरची घोषणा केली आहे. त्याने सांगितले की,”आजपासून तुम्ही एकाच व्हॉट्सअ‍ॅप खात्याचे चार फोनवर लॉग इन करू शकता” या नव्या फिचरमुळे वापरकर्त्यांची डिव्हाईस बदलण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. लोकांच्या या त्रासाबाबत अनेकदा तक्रारी आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Whatsapp काय आहे नवीन फिचर?

वेब ब्राउझर, टॅबलेट आणि डेस्कटॉपवर Whatsapp वापरले जाते. आधी फोनवरून जर तुम्ही वरीलपैकी कोणत्या डिव्हाईसला कनेक्ट झाला असाल तर इतर कोणत्याच डिव्हाईसला कनेक्ट होता येत नव्हते. या फिचरमुळे तुम्ही जरी एका डिव्हाईसला कनेक्ट असाल, तरी आता तुम्हाला एकाचवेळी अजून चार डिव्हाईससोबत एकत्रपणे कनेक्ट होता येणार आहे. जर तुम्ही मूळ डिव्हाईसपासून काही काळ दूर असाल, तर तुमचे अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला इतर सर्व डिव्हाइसमधून आपोआप लॉग आउट करणार आहे. तसेच तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो आणि कॉल्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड राहणार आहेत.

Whatsapp

तसेच या नव्या अपडेटसह तुम्ही आता अगदी सहज कोणत्याही डिव्हाईसेसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकता आणि तुमचे चॅट्स तुम्ही जिथे होतात तिथून पुन्हा मिळवू शकता. दरम्यान हे बहुप्रतिक्षित फिचर कधी येणार आहे या बाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.