पैसे न भरता मिळाले फ्री ट्विटर सब्सक्रिप्शन! नेमके सुरू काय? नेटकरीही गोंधळले

ज्या यूजर्सने सब्सक्रिप्शन विकत घेतले नाही, त्यांनाही आता ब्लू टिक परत मिळाली आहे. त्यामुळे ट्विटरवर नेमके सुरू काय आहे या विचाराने नेटकऱ्यांचाही गोंधळ झाला आहे.

158
twitter Blue tick
ट्विटरवर ब्लू टिकचा गोंधळ

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन, योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकरसह विराट कोहलीसारख्या अनेक दिग्गजांची ट्विटर ब्लू टिक गायब झाली होती. यात दिपिका पडुकोण, रणवीर सिंह, रोहित शर्मा, रोनाल्डोचाही समावेश होता. ज्यांनी ट्विटर सब्सक्रिप्शन विकत घेतले नव्हते. त्यांची ब्लू टिक कंपनीकडून काढून घेण्यात आली. पण आता एक नवा गोंधळ झाला आहे. ज्या यूजर्सने सब्सक्रिप्शन विकत घेतले नाही, त्यांनाही आता ब्लू टिक परत मिळाली आहे. त्यामुळे ट्विटरवर नेमके सुरू काय आहे या विचाराने नेटकऱ्यांचाही गोंधळ झाला आहे.

( हेही वाचा : “त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी…” शरद पवारांच्या त्या विधानावर राऊतांनी दिले स्पष्टीकरण)

ब्लू टिकसाठी घ्या सब्सक्रिप्शन

मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एलॉन मस्क यांनी मोठी किंमत मोजून ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून ट्विटरने बरेच बदल पाहिले आहेत. मस्क यांनी घेतलेले निर्णय कायम चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यापैकी एक वादग्रस्त निर्णय म्हणजे ब्लू टिकसाठी यूजर्सकडून पैसे घेणे. मोबाईल युजर्सना या ब्लू टिकसाठी दर महिन्याला ९०० रूपये मोजावे लागणार आहेत तर वेब यूजर्सना ६५० रुपये. ब्लू टिकच्या प्रेमाखातर अनेकांनी लगेच सब्सक्रिप्शन विकत घेतले. पण आता ही सुविधा काही खास युजर्सना मोफत मिळाली आहे.

( हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुलांच्या साहित्य खरेदीचा प्रशासनाचा अंदाज फसला: वाढीव साहित्याच्या खरेदीसाठी सुमारे साडेबारा हजारांचा खर्च)

युजर्स काय म्हणाले?

१० लाखाहून अधिक फॉलोवर्स असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांची टिक परत मिळाली आहे. अचानक मिळालेल्या ब्लू टिकचा फोटो अनेक यूजर्सनी पोस्ट केला आहे. ही टिक परत कशी आली याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. या युजर्सचे असे म्हणणे आहे की त्यांनी सब्सक्रिप्शन विकत घेतलेले नाही. तरीही त्यांना आपोआप ब्लू टिक मिळाली आहे.

( हेही वाचा : पाकिस्तानसुद्धा सांगेल शिवसेना कुणाची; निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल  )

नेटकरी गोंधळले

हा टेक्निकल ग्लिच आहे की दुसरे काही? याचा विचार सध्या नेटकरी करत आहेत. या विषयी आतापर्यंत कंपनीकडून किंवा मस्क यांच्याकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत राहिलेला आहे. परंतु ज्यांना ब्लू टिक मिळाले आहे ते युजर्स सध्यातरी खूश आहेत.

( हेही वाचा : सुदानमध्ये परिस्थिती गंभीर! भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची विशेष योजना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.