maratha mandir theatre : मुंबईतलं मध्यमवर्गीय मराठी माणसांचं हक्काचं थिएटर, मराठा मंदिर!

70
maratha mandir theatre : मुंबईतलं मध्यमवर्गीय मराठी माणसांचं हक्काचं थिएटर, मराठा मंदिर!

मराठी माणसाला राजकारण, नाटक आणि चित्रपट यामध्ये प्रचंड रुची आहे. नाटकांच्या बाबतीत मुंबईत शिवाजी मंदिर, साहित्य संघ, प्रबोधन, दिनानाथ, रवींद्र, दामोदर इ. नाट्यगृहे प्रसिद्ध आहेत. आता अनेक चित्रपटगृहे निर्माण झाली आहेत. मल्टिप्लेक्सचा जमाना आहे. पण पूर्वी प्लाझा आणि मराठा मंदिर हे मराठी माणसाचं चित्रपट पाहण्याचं हक्काचं ठिकाण होतं. आजही इथे गर्दी असते. मात्र पूर्वी यास अधिक महत्त्व होतं.

मराठा मंदिर थिएटर (maratha mandir theatre) हे मराठा मंदिर मार्ग, मुंबई, येथे स्थित आहे. हा सिनेमा हॉल एका अर्थाने ऐतिहासिक म्हणावा लागेल. १६ ऑक्टोबर १९५८ रोजी हे थिएटर प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. इथे १००० आसने आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकात, इथे चित्रपटाची लॉन्चिंग व्हायची. पण मल्टिप्लेक्स आल्यानंतर इतर लोक या आधुनिक थिएटर्सकडे वळले. मात्र महाराष्ट्रातील कामगार वर्ग मराठा मंदिरमध्ये येत राहिला.

(हेही वाचा – ATS Raid Pune : पुण्यात एटीएसचा छापा; बनावट टेलिफोन एक्स्चेंजमधून ३ हजार ७८८ सीम कार्ड जप्त)

या चित्रपटगृहाचं (maratha mandir theatre) वैशिष्ट्य असं की शाहरुख खान याचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) हा चित्रपट इथे हक्काने दाखवला जायचा. कारण १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठा मंदिरमध्ये विक्रम केला आहे. १००९ आठवडे हा चित्रपट प्रेक्षांच्या गर्दीत सुरु होता. २०१९ पर्यंत हा चित्रपट मराठा मंदिरमध्ये आपले स्थान कायम ठेवून होता.

उच्चभ्रू लोक मराठा मंदिरकडे (maratha mandir theatre) फिरकत नसले तरी कामगार वर्ग विशेषतः मराठी माणसामुळे या थिएटरचे अस्तित्व अजूनही अबाधित आहे. मराठी माणसाचे वैशिष्ट्य असे की तो नव्या गोष्टी स्वीकारतो पण आपले मूळ कधीच विसरत नाही. मराठा मंदिरचा हा इतिहास नव्या पिढीला कळाला पाहिजे. नव्या पिढीनेही कधीतरी इथे चित्रपट पाहून इतिहास पुन्हा जीवंत केला पाहिजे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.