Makhana Benefits : मखाना हे दैनंदिन आहाराचा एक भाग म्हणून सेवन केले तर काय फायदा होईल?

101
Makhana Benefits : मखाना हे दैनंदिन आहाराचा एक भाग म्हणून सेवन केले तर काय फायदा होईल?
Makhana Benefits : मखाना हे दैनंदिन आहाराचा एक भाग म्हणून सेवन केले तर काय फायदा होईल?

मखानामध्ये कमी फॅट्स आणि जास्त कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे ते इतर ड्रायफ्रूटपेक्षा (Dried Fruit) जास्त पौष्टिक असतात. मखानामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. तसंच ते साखर, प्रोटीन्स, एस्कॉर्बिक ऍसिड आणि फिनॉल कंटेंट्सच्या बाबतीत बदाम, अक्रोड, नारळ आणि काजू सारख्या सुक्या मेव्यांपेक्षा मखाने चांगले असतात. याव्यतिरिक्त भात किंवा ब्रेड सारख्या पदार्थांमध्ये असलेल्या उच्च कार्बोहायड्रेटयुक्त कंटेंटपेक्षा मखान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्समध्ये लक्षणीयरीत्या कमी प्रमाणात असतं. (Makhana Benefits)

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव, प्रदूषण आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागते आणि लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनसारखे अनेक आजार बळावतात. मखानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटक असतात. हे पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याव्यतिरिक्त इतर अनेक फायदे शरीराला मिळतात. (Makhana Benefits)

(हेही वाचा – पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा; Ashish Shelar यांचे आवाहन)

मखान्याचे संतुलित सेवन केल्याने कोणते फायदे मिळतात?
  • हृदयरोगाचा धोका कमी होतो
  • वृद्धत्वविरोधी गुणधर्म असल्याने अँटीएजिंगचं काम करतात.
  • संधिवाताचा धोका कमी होतो.
  • मधुमेह आणि लठ्ठपणापासून बचाव होतो.
  • कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असतात.
  • अतिसारापासून बचाव होतो किंवा आराम मिळतो
  • रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
  • रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • सर्व वयोगटातल्या लोकांसाठी पचनासाठी योग्य असते.
  • भूक वाढवते.
  • शारीरिक कार्यक्षमता वाढवते.
  • यात असलेल्या तुरट गुणधर्मामुळे मूत्रपिंडाचे आजार होत नाहीत.
  • एनर्जी बूस्टर.
  • श्वसनसंस्थेचं कार्य सुधारते, शरीरातल्या धमन्यांचं आरोग्य वाढवते आणि अन्नपचनास मदत करते
  • निद्रानाश, छातीत धडधडणे, चिडचिड कमी करण्यास गुणकारी असतात.
  • यांमध्ये १२% प्रोटीन्स असतात त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी एक चांगलं अन्न मानलं जातं.
मखाना कशाप्रकारे खाल्ले जातात.

मखाना हे कच्चे किंवा भाजून खाता येतात. जास्त करून लोक सकाळच्या नाश्त्याला भाजलेले मखाने खातात. हे स्नॅक म्हणून भाजून खातात. याव्यतिरिक्त मखान्याच्या कच्च्या बियांची पेस्ट करून तिचा वापर चिनी पेस्ट्री आणि जपानी मिष्टान्नांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजलेले किंवा कच्चे मखाने तुमच्या नियमित आहारात समाविष्ट केल्याने तुमच्या शरीरात लक्षणीय बदल घडून येताना दिसतील. (Makhana Benefits)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.