-
ऋजुता लुकतुके
महिंद्राची थार लाईन अप ही त्यांच्या ब्रँडची ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लांब पल्ल्याचा प्रवास आणि डोंगर-दऱ्या तसंच जंगल सफारीचा प्रवास अशा कुठल्याही मोहिमेसाठी भारतीयांना महिंद्रा थारच डोळ्यासमोर येते. आधी ३ डोअर असलेली ही गाडी नंतर कंपनीने ५ डोअर म्हणजे कुटुंबाची गाडी म्हणूनही लाँच केली. पण, साहसी, तरुण भारतीयांमध्ये अजूनही थार ३-डोअरविषयी आपुलकी आहे. अशी ही थार मालिकेतील पहिली गाडी २०२५ मध्ये नवीन फिचरसह लाँच होणार आहे. (Mahindra Thar 3-Door)
म्हणजे गाडीला फेसलिफ्ट मिळणार असला तरी गाडीचं इंजिन आणि इतर गोष्टी तशाच आहेत. पण, त्यातील सुविधा आता थार रॉक्ससारख्या असतील, असं बोललं जात आहे. या गाडीचं छत आणि दरवाजे आधीच्या थार प्रमाणेच काढून टाकता येतात. व्हीलबेस मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने वाढवण्यात आला आहे. अलीकडेच महिंद्रा थारचं टेस्टिंग सुरू असताना ही कार सोशल मीडियावर पहिल्यांदा व्हायरल झाली होती. तो व्हीडिओ पाहूया. (Mahindra Thar 3-Door)
(हेही वाचा – New Toll Policy 2025 : ३००० रुपये भरा; वर्षभर टोलमुक्त प्रवास करा)
Mahindra Thar 3-door facelift expected in the second-half of 2025.
It will be getting many new features from the Thar Roxx. pic.twitter.com/xNkDtvgwb4
— Auto News India (ANI) (@TheANI_Official) March 23, 2025
गाडीत १०.२५ इंचांचा नवीन डिस्प्ले आला आहे. गाडीचं ग्रील तर बदललं आहेच. शिवाय दिवेही एलईडी झाले आहेत. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात ६ एअरबॅग असतील. चालकाच्या संरक्षणासाठी दुसऱ्या पिढीतील एडीएएस यंत्रणा असेल. शिवाय गाडीतील पार्किंगसाठी वापरला जाणारा कॅमेरा ३६० अंशांत चित्रण करू शकेल. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांमध्ये गाडी उपलब्ध आहे. १.५ लीटर टर्बो इंजिन बसवण्यात आलं आहे. शिवाय गाडीतील आतली जागाही अधिक प्रशस्त झाली आहे. पाय मोकळे सोडता येतील. कसंच गाडीची उंचीही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे गाडीतील प्रवास आता जास्त आरामदायी होणार आहे. (Mahindra Thar 3-Door)
शिवाय गाडीतील स्टोरेज म्हणजे सामन ठेवण्याची जागा कमी झालेली नाही. जंगलात वापरायचे ४ तंबूही यात आरामात मावू शकतात इतकी जागा गाडीत आहे. लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवीन थारमध्ये इन्फोटेनमेंट प्रणाली, मनोरंजनाची इतर साधनंही अद्ययावत करण्यात आली आहेत. या गाडीची किंमत १२ लाखांपासून सुरू होईल. (Mahindra Thar 3-Door)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community