Mahindra Finance : ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून सुरूवात झालेली कंपनी कशी पोहोचली स्वत:च्या म्युच्युअल फंडापर्यंत 

Mahindra Finance : १९९१ मध्ये मॅक्सी मोटर्स फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या रुपात या कंपनीची सुरुवात झाली होती

107
Mahindra Finance : ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून सुरूवात झालेली कंपनी कशी पोहोचली स्वत:च्या म्युच्युअल फंडापर्यंत 
Mahindra Finance : ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून सुरूवात झालेली कंपनी कशी पोहोचली स्वत:च्या म्युच्युअल फंडापर्यंत 
  • ऋजुता लुकतुके 

उद्योजकता ही संधी असते. अनेकदा उद्योजकता संधी निर्माण करते. म्हणजे बघा देशात हरित क्रांतीमुळे कृषि सुधारणा अव्याहत होत होत्या.  शेतकऱ्यांकडे जुने नांगर जाऊन ट्रॅक्टर येत होते. महिंद्रा अँड महिंद्रा ही देशी कंपनी हे ट्रॅक्टर बनवण्यात अग्रेसर होती. ग्रामीण भागात मोठी वाहनं बनवणं हा कंपनीचा उद्योग होता. पण, ग्रामीण भागांत या उत्पादनांची गरज होती. पण, खरेदी करण्यासाठी या लोकांकडे पैसे नव्हते. ही गरज ओळखून महिंद्रा कंपनीने १९९१ मध्ये मॅक्सी मोटर्स फायनान्शिअरल सर्व्हिसेस या नावाने एक छोटी वित्तीय सेवा सुरू केली. कंपनीचे ट्रॅक्टर घेण्यासाठी छोटी-छोटी कर्ज देणं हे या कंपनीचं काम होतं. (Mahindra Finance)

(हेही वाचा- Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र)

त्यासाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना कंपनीला मिळाला. तिथून १९९२ मध्ये महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस अशा नावाने कंपनी पुन्हा लाँच झाली. यावेळी रिझर्व्ह बँकेकडे बँकेतर वित्तीय संस्था म्हणून ही कंपनी वर्ग झाली. तिथून कंपनीचा प्रवास असा भन्नाट सुरू झाला की, आज देशभरात कंपनीच्या १,००० हून अधिक शाखा आहेत. (Mahindra Finance)

२००२ मध्ये पहिल्यांदा कंपनीने महिंद्राची सोडून इतर कुठली तरी गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज दिलं. ही सुरुवात ऐतिहासिकच म्हणावी लागेल. कारण, तिथून पुढे कंपनीच्या सेवा विस्तारत गेल्या. वाहन कर्ज देणारी ही कंपनी लघुउद्योगांना कर्ज पुरवठा करू लागली. म्हणता म्हणता २०२४ पर्यंत कंपनी आणखी ६ प्रकारच्या सेवा देऊ लागली आहे. (Mahindra Finance)

(हेही वाचा- Indian Economic Service : भारतीय अर्थशास्त्रीय सेवेतील अधिकाऱ्याची कामे काय असतात? त्याला किती पगार मिळतो?)

  • वाहन कर्ज – वाहन कर्ज हे कंपनीचं मुख्य काम आहे. दुचाकी, रिक्षा, कार, ट्रॅक्टर, अवजड वाहनं अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कंपनी वित्तपुरवठा करते. (Mahindra Finance)
  • एसएमई फायनान्सिंग – लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांना कंपनी वित्तपुरवठा करते. प्रकल्पासाठीचं कर्ज, साधन-सामुग्री खरेदीसाठी कर्ज तसंच धावतं भांडवल उभारण्यासाठी कंपनी कर्ज देऊ करते (Mahindra Finance)

(हेही वाचा- Lehgaon News : विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेहगाव येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन)

  • गृहकर्ज – ग्रामीण तसंच निमशहरी भागात खासकरून कंपनी घर बांधायला कर्ज देऊ करते. तसंच शहरी भागांत घर खरेदीसाठीही कंपनी कर्ज देते (Mahindra Finance)
  • विमा उद्योग – कंपनी किरकोळ तसंच कॉर्पोरेट ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा योजनाही देऊ करते. (Mahindra Finance)

(हेही वाचा- Jammu and Kashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण)

  • असेट मॅनेजमेंट – कंपनीने अलीकडेच आपले म्युच्युअल फंडही सुरू केले आहेत. (Mahindra Finance)
  • म्युच्युअल फंड वितरण – स्वत:च्या म्युच्युअल फंडांबरोबरच कंपनी काही फंडांचं वितरणही करते (Mahindra Finance)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.