lic aao salary : LIC AAO ला किती असतो पगार? आणि काय असतं त्यांचं काम?

93
lic aao salary : LIC AAO ला किती असतो पगार? आणि काय असतं त्यांचं काम?

LIC AAO ला किती पगार असतो ते जाणून घेण्याआधी त्यांचं जॉब प्रोफाइल काय असतं, ते समजून घेऊयात..

  • LIC AAO असलेल्या व्यक्तीला नवीन योजना तयार कराव्या लागतात आणि नवीन धोरणेही पाहावी लागतात.
  • AAO यांचं काम पर्यवेक्षण करण्याचं असतं. ग्राहकांचे क्लेम आणि सेटलमेंट दाखल करतात.
  • तसंच ते मदतीसाठी तत्पर असतात. संबंधित इतर विभागांशी समन्वय साधतात.
  • बऱ्याचदा ते ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यात मदत करतात आणि सर्व ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध राखतात.
  • LIC AAO यांना त्यांच्यापेक्षा उच्च विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिलेली कामं त्यांना वेळेतच पूर्ण करावी लागतात.
  • तसंच महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वस्तुस्थितीची पाहणी करून त्यातील तथ्यात्मक त्रुटी निदर्शनास आणाव्या लागतात. (lic aao salary)

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची मुख्यमंत्री पदावरून चिडचीड उघड)

चांगल्या पगाराबरोबरच LIC AAO ना अनेक भत्ते आणि फायदेसुद्धा मिळतात. ते खालीलप्रमाणे आहेत.
  • महागाई भत्ता
  • घर भाडे भत्ता
  • वाहतूक भत्ता
  • विशेष भत्ता
  • गट विमा
  • प्रवास सवलत
  • वैद्यकीय सुविधा
  • अपघात विमा
  • वैयक्तिक वाहनासाठी कर्जाची सुविधा
  • जेवणाचं कूपन
  • मोबाईल व इतर दैनंदिन गरजेचा खर्च इ.
  • (lic aao salary)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी पाकला जाणार का? सचिव जय शाह काय म्हणाले?)

LIC AAO अधिकारी पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची भरती करण्यासाठी LIC AAO ची परीक्षा आयोजित करते. या परीक्षेला बसण्यास इच्छुक उमेदवारांना या पदाशी संबंधित असलेला पगार आणि नोकरी प्रोफाइलबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. LIC AAO चा पगार ही एक अतिशय आकर्षक रक्कम असते.

LIC AAO चं काम निवडण्यामागे उमेदवारांचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा पगार होय. LIC AAO ना महिना रु. ५३,६०० एवढा पगार मिळतो. नवीन जॉईन झालेल्या LIC AAO ला इन-हँड रु. ८०,८७० इतका पगार मिळतो. त्यानंतर पुढे त्यांनी १४ वर्षं कंपनीची सेवा केल्यानंतर त्यांचा मूळ पगार रु. ९०,६३० एवढा होतो.

याव्यतिरिक्त LIC AAO कर्मचाऱ्यांना मोठे भत्ते देखील दिले जातात. (lic aao salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.