Legal Advisor Salary : कायदेविषयक सल्लागाराचं नेमकं काम काय? त्याला मासिक किती पगार मिळतो? 

68
Legal Advisor Salary : कायदेविषयक सल्लागाराचं नेमकं काम काय? त्याला मासिक किती पगार मिळतो? 
Legal Advisor Salary : कायदेविषयक सल्लागाराचं नेमकं काम काय? त्याला मासिक किती पगार मिळतो? 
  • ऋजुता लुकतुके 

कायदेविषयक सल्लागार हे पद आव्हानात्मक, जिकिरीचं पण, तितकंच प्रतीष्ठेचं आहे. कारण, कंपनीच्या संरचनेत कायदेविषयक सल्लागाराला खूप महत्त्व आहे. किचकट, न समजणारे कायदे व्यवहारात वापरण्याचं कौशल्य या व्यक्तीकडे असतं. त्यामुळे मग कंपनीला कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचं आणि तरीही अडचणीत सापडल्यास त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याचं काम हा सल्लागार करत असतो. (Legal Advisor Salary)

(हेही वाचा- Pandharpur मध्ये दर्शन रांगेसाठी ‘स्कायवॉक’ होणार; १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मान्यता)

कंपनीने सगळ्या कायदेशीर बाबी आणि अटी, शर्तींची पूर्तता केली आहे ना हे तपासून बघणं, कंपनीच्या करारांमधील कायदेशीर मुद्दे संबंधितांना समजावून सांगणं, हे व्यवहार कायद्याच्या कसोटीवर चोख होतील याची खात्री करून घेणं, कंपनीचे काही तंटे असतील तर ते सोडवण्यासाठी मदत करणं ही महत्त्वाची कामं या सल्लागाराला करायची असतात. त्यामुळे कायदा समजण्याबरोबरच त्याची व्यवहार्यता समजून घेणं आणि त्याचं विश्लेषण करणं हे कौशल्य कायदेविषयक सल्लागाराकडे असायला हवं. (Legal Advisor Salary)

साधारणपणे कायद्यातील पदवी आणि त्यानंतर बार काऊन्सिलकडे नोंदणी असेल तर अशी व्यक्ती कायदेविषयक सल्लागार होऊ शकते. त्यात एखाद्या विषयात अधिक ज्जान असेल तर त्याचा फायदाच होतो, जसं की, करविषयक कायदे, बांधकाम क्षेत्रातील कायदे इ. (Legal Advisor Salary)

(हेही वाचा- Mumbai Metro 3 : बीकेसी-आरे प्रवास आता सोपा; मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार)

कायदेशीर सल्लागाराचा पगार हा अनुभव आणि कामातील कौशल्यानुसार वाढत जातो. पण, सध्या देशभरातील ४०,००० नोकऱ्यांचा आढावा घेतल्यावर ग्लासडोअर या वेबसाईटच्या मते कायदेशीर सल्लागाराला देशात सरासरी वार्षिक ५.९ लाख रुपये इतका पगार मिळतो. तर मासिक पगार रु ५१,००० रुपये इतका असू शकतो. तर १० वर्षं किंवा त्याहून अधिक अनुभवी व्यक्तीचा पगार वार्षिक १४ लाखांपर्यंत जातो.  (Legal Advisor Salary)

अनुभव

सरासरी (वार्षिक)

पगाराची मर्यादा (रुपयांमध्ये)

एक वर्षापेक्षा कमी

रु. ५.९ लाख

१.४ ते १३.९ लाख

१-५ वर्षं

रु. ६ लाख

१.५ ते १५ लाख

६-१० वर्षं

रु. ६.५ लाख

२ ते १५ लाख

१० वर्षांहून जास्त

रु ७ लाख

२.५ ते १५ लाख

 

कायदेशीर सल्लागार हे खूप महत्त्वाचं पद आहे. अशा व्यक्तीकडे विश्लेषण क्षमता, संवाद कौशल्य, वाटाघाटी करण्याचं कौशल्य, बारकाईने अभ्यास करण्याची सवय, नैतिकतेचं भान, सामाजिक दृष्टिकोण आणि सांस्कृतिक ज्जानही आवश्यक आहे. (Legal Advisor Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.