Larsen and toubro share price : एल अँड टी कंपनीचा शेअर अलीकडे एवढा का वाढला?

Larsen and toubro share price : लार्सन टुब्रो शेअरवर परिणाम करणारे घटक कुठले?

90
Larsen and toubro share price : एल अँड टी कंपनीचा शेअर अलीकडे एवढा का वाढला?
  • ऋजुता लुकतुके

लार्सन अँड टुब्रो ही पायाभूत सुविधा तसंच अवजड उद्योग क्षेत्रातील देशातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीला एल अँड टी असं लघुरुप मिळालं आहे आणि याच नावाने कंपनी प्रसिद्ध आहे. १९३८ मध्ये हेनिंग लारसन आणि सोरेन टुब्रो या दोन डॅनिश अभियंत्यांनी या कंपनीची भारता स्थापना केली. औद्योगिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा उभारणी, उत्पादन, ऊर्जा, बांधकाम, वित्तीय सेवा आणि संरक्षण सामुग्री उत्पादन या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे.

मार्च २०२२ पर्यंत एल अँड टीने शअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, समुहाच्या ९३ उपकंपन्या, ५ असोसिएट कंपन्या आणि २७ संयुक्त उपक्रम आहेत. अलीकडे कंपनीला मिळालेल्या काही नवीन कामांमुळे एल अँड टी कंपनीचा शेअर मागच्या महिन्याभरात तब्बल साडेचार टक्क्यांनी वाढला आहे. तर शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर ३,६०५ वर बंद झाला आहे. (Larsen and toubro share price)

(हेही वाचा – Mahindra XUV700 : महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० कारच्या किमती अचानक का वाढल्या?)

New Project 2024 11 23T213415.274

शेअरच्या या वाढीमागे असलेली कारणं बघूया,

कोलकाता मेट्रो भागात एका ७ किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरसाठी एल अँड टी कंपनीने आवेदन सादर केलं आहे. त्यामुळे एकदा सरकारी मंजुरी मिळाली की, हे मोठं कंत्राट एल अँड टीलाच मिळणार आहे. शिवाय देशातील महत्त्वाचे पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्प हे एल अँड टीच्या हातात आहेत. अशा कंत्राटांचा ओघ सातत्यपूर्ण असल्यामुळेच एल अँड टीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक केली आहे.

एल अँड टी ऊर्जा कंपनीला सरकारी कंपनी एनटीपीसीकडून १५,००० कोटी रुपयांची औष्णिकऊर्जा प्रकल्प उभारणीचं कंत्राट मिळालं आहे. २०२० मध्ये कंपनीने बुलेट ट्रेन उभारणीचं कंत्राट जिंकलं होतं. त्यानंतरचं कंपनीचे हे सगळ्यात मोठं कंत्राट असल्याचा अंदाज बाजारात व्यक्त होत आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसून येत आहे. (Larsen and toubro share price)

(हेही वाचा – Niva Bupa Share Price : गेल्याच आठवड्यात शेअर बाजारात नोंदणी झालेला निवा बुपाचा शेअर कशी कामगिरी करतोय?)

एल अँड टी इन्फोटेक कंपनीने एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात आपला विस्तार सुरू केला आहे. त्यादृष्टीने ई-टू-ई नेटवर्क्स या कंपनीमध्ये एल अँड टी कंपनीने १,४०७ कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एआय आणि क्लाऊड स्टोरेज क्षेत्रातही कंपनीचे हौसले बुलंद दिसत आहेत.

कंपनीमधील या ताज्या घडामोडींमुळे संशोधन संस्था आणि ब्रोकरेज हाऊसेसनी एल अँड टी शेअरसाठीचं लक्ष्य वाढवलं आहे. एलकेपी सेक्युरिटीजने एल अँड टी शेअर ४,०५० पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर आयसीसीआयसीआय सेक्युरिटीजनेही शेअरवर बाय कॉल दिला आहे.

याशिवाय एल अँड टी कंपनीने अलीकडे जाहीर केलेला तिमाही ताळेबंदही गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा ७.०६ टक्क्यांनी वाढला आहे. तर महसूलातील वाढही ११ टक्के आहे. त्याचाही परिणाम शेअरवर झाला आहे. (Larsen and toubro share price)

(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीम आहे आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअरमध्ये गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी विक्रीवर सल्ला देत नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.