PICT Pune म्हणजेच pune institute of computer technology चं पॅकेज किती आहे?

101
PICT Pune म्हणजेच pune institute of computer technology चं पॅकेज किती आहे?

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने १९८३ साली कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आली होती. हा डिपार्टमेंट महाराष्ट्रातल्या सेल्फ फायनान्स संस्थांमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यात अग्रेसर आहे. डॉ. गीतांजली व्ही. काळे यांच्या नेतृत्वाखाली ५२ टिचिंग आणि १० टेक्निकल कर्मचाऱ्यांची एक टीम या डिपार्टमेंटला अधिक उंचीवर नेण्यासाठी कार्यरत आहे. या डिपार्टमेंटकडे १९८३ साली ६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. सध्या पदवीपूर्व कार्यक्रमासाठी प्रवेशाचं प्रमाण २४० एवढं आहे. (PICT Pune)

या डिपार्टमेंटला A.I.C.T.E. यांच्याकडून कडून A.Y. पासून ६० विद्यार्थ्यांना २०२४-२५ या सालादरम्यान हल्लीच्या प्रोफेशनल व्यावसायिकांसाठी UG प्रोग्राम कंडक्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगमधला PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम २००० साली २५ विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसोबत सुरू करण्यात आला होता. पुढे २०१३ साली डेटा सायन्समध्ये २४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबत PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन ऍडमिशन घेतलं गेलं. त्यानंतर २०२० सालापर्यंत दुसऱ्या डिपार्टमेंटला ऍडमिशनची संख्या ४९ पर्यंत वाढली होती. (PICT Pune)

(हेही वाचा – Chembur Sexual Assault : मुंबईत शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून लैंगिक छळ)

२०२० साली २४ विद्यार्थ्यांचा एक दुसरा डिपार्टमेंट डेटा सायन्स या विषयात PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये रूपांतरित झालेला आहे. २०२२-२३ साली A.Y. पासून डेटा सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग PG प्रोग्राम्समध्ये प्रत्येकी १२ विद्यार्थी आहेत. २०१२ सालापासून या डिपार्टमेंटने पीएच.डी. रिसर्च सेंटर तसंच सर्व UG, PG आणि Ph.D. कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी SPPU संलग्न केलेले आहेत. (PICT Pune)

रु. १३.५ लाख प्रतिवर्षं या सरासरी पॅकेजसह विद्यार्थ्यांना नियमितपणे उच्च शिक्षणासाठी MNC मध्ये स्थान दिलं जातं. इथले विद्यार्थी जगभरातल्या सर्वोच्च विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा, प्रोजेक्ट एक्झिबिशन्स, हॅकाथॉन, स्पोर्ट्स कॉम्पिटीशन तसंच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित केलं जातं. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके जिंकली आहेत. हा डिपार्टमेंट प्री-प्लेसमेंट ऑफरसोबतच विशिष्ट कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतो. (PICT Pune)

(हेही वाचा – hyatt place pune या हॉटेलचे नाव hyatt का ठेवण्यात आले? जाणून घ्या!)

PICT ची क्षमता

●युनिव्हर्सिटीच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल
●विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्लेसमेंट
●इंडस्ट्री स्पॉन्सर्ड स्टुडंट्स प्रोजेक्ट आणि इन हाऊस प्रोडक्ट डेव्हलपमेंट
●सुयोग्य प्राध्यापक आणि कुशल टेक्निकल स्टाफ
●आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय जर्नल्समधील प्रकाशनं तसंच शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात येणारी परिषदे
●युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक आणि वार्षिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग
●संशोधनात सहभाग आणि अभ्यासक्रम विकासामध्ये सक्रिय सहभाग
●A.C.M., I.E.E.E., C.S.I. चे सर्वोत्कृष्ट चॅप्टर्स
●सेमिनार, वर्कशॉप्स, आणि कॉन्फरन्स यांचं आयोजन.
●उद्योग, संस्था आणि सरकारी एजन्सींमधल्या व्यक्तींतर्फे एक्स्पोजर
●क्युरिक्युलम डेव्हलप करण्यासाठी रिसर्च आणि सक्रिय सहभाग
●स्टुडंट्स अचिव्हमेंट्स किंवा प्रोजेक्ट्स, हॅकाथॉन, प्रश्नमंजुषा, प्रोग्रामिंग आणि सेमिनार मालिका यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभाग.
●डिपार्टमेंटमधल्या माजी विद्यार्थ्यांची बिझनेस, स्टार्ट-अप आणि एंटरप्रीनरशीप
●कन्सल्टन्सी आणि रीसर्चच्या दिशेने पाऊल कायम पुढे

(हेही वाचा – Mumbai Local : मुंबईकरांना मोठा दिलासा; तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या होणार दुप्पट)

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी म्हणजेच PICT मध्ये ऑफर केलेले सरासरी पॅकेज रु. १२-१३.५ लाख प्रतिवर्षं यादरम्यान आहे. पण सर्वोच्च पॅकेज रु. ४३ लाख प्रतिवर्षं इतकं असू शकतं.

PICT मधल्या काही टॉप रिक्रूटर्समध्ये अडॉब, फोन-पे, सिमन्स, मास्टरकार्ड, बजाज आणि बार्कलेस यांचा समावेश आहे. या कंपन्यांमध्ये PICT चे विद्यार्थी सॉफ्टवेअर डेव्हलपर, डिझाइनर, फ्रीलांसर, सॉफ्टवेअर व्यवस्थापक आणि सॉफ्टवेअर आर्किटेक्ट या पदांवर नियुक्त झालेले आहेत. PICTचे प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून त्यांचे करिअर घडविण्यात मदत करतात. (PICT Pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.