kharkhoda haryana : हरियाणातील खरखोडा गावाच्या प्रगतीचे काय आहे वैशिष्ट्य?

68
kharkhoda haryana : हरियाणातील खरखोडा गावाच्या प्रगतीचे काय आहे वैशिष्ट्य?

खरखोडा (kharkhoda haryana) हे भारताच्या हरियाणा राज्यातल्या सोनिपत नावाच्या जिल्ह्यातलं एक शहर आहे. हे शहर राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा एक भाग आहे. खरखोडा शहरातलं छापडेश्वर महादेव मंदिर हे अतिशय लोकप्रिय आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी भक्तजन आणि पर्यटक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येतात.

हे शहर दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ आहे. त्यामुळे या शहरामध्ये औद्योगिक आणि निवासी विकासाला पुष्कळ वाव आहे. म्हणूनच हरियाणा राज्य औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाने औद्योगिक मॉडेल टाउनशिप विकसित करण्यासाठी ३,२०० एकर जमीन संपादित केली आहे. या शहरापासून वेस्टर्न पेरिफेरल हा एक्सप्रेसवे फक्त १ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तसंच दिल्ली-अमृतसर-कटरा हा एक्सप्रेसवे या खरखोडा (kharkhoda haryana) शहरापासून ५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

(हेही वाचा – chikka tirupathi ला जाऊन दर्शन घ्यायचंय, मग इथे आहे संपूर्ण मार्गदर्शन!)

२८ ऑगस्ट २०२२ या दिवशी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खरखोडा या शहरात मारुती सुझुकी या कंपनीच्या नवीन उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी केली. खरखोडा ब्लॉकच्या खांदा नावाच्या गावात भारतीय सैन्यातल्या महान सेनापतींपैकी एक असलेले बाबा बंदा सिंग बहादूर महान यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचं उद्घाटन खांडा, सोनिपत या ठिकाणी साजरा करण्यात आलेल्या शौर्य दिनानिमित्त हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

खरखोडा (kharkhoda haryana) या गावात सर्वसाधारणपणे हरीयाणवी ही भाषा बोलली जाते. खांदा हे खरखोडा शहरातलं एक मोठं आणि ऐतिहासिक गाव आहे. हे गाव जवळच्याच रोहतक शहरापासून पश्चिम दिशेला १६ मैल एवढ्या अंतरावर आहे. खरखोडा ते सोनिपत यातलं अंतर १९ किलोमीटर एवढं आहे. या शहराचं प्रशासन चालवण्यासाठी नगरपालिका नेमलेली आहे. तसंच इथे खरखोडा शहरातलं मुख्य तहसीलही आहे.

(हेही वाचा – Andhra Pradesh Rain: पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा!)

या शहरामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी समाजासाठी सोयी-सुविधा आहेत. त्यांमध्ये एक कॉलेज, नागरी पशुवैद्यकीय रुग्णालय, एक नागरी दवाखाना, एक मुख्य पोस्ट ऑफिस आणि एक पोलीस स्टेशन देखील आहे. तसंच खांदा-मोडजवळ एक मुख्य धान्य बाजारदेखील आहे.

लवकरच खरखोडा (kharkhoda haryana) शहर हे इंडस्ट्रियल मॉडेल टाऊन होणार आहे. तसंच ठाणे कलान रोड येथे नवीन सिव्हिल हॉस्पिटल बांधण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये नव्याने बांधलेल्या बायपासपर्यंत नवीन रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे. पूर्वी हे शहर रोहतक रोड आणि सोनिपत रोडला जोडत नव्हते. पण बायपासचा हा नवा रस्ता तयार केल्यानंतर आता गावं एकमेकांना जोडणं शक्य झालं आहे. बायपास रोडवर आयटीआय बांधण्यात आलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.