chikka tirupathi ला जाऊन दर्शन घ्यायचंय, मग इथे आहे संपूर्ण मार्गदर्शन!

75
chikka tirupathi ला जाऊन दर्शन घ्यायचंय, मग इथे आहे संपूर्ण मार्गदर्शन!

चिक्का तिरुपती (chikka tirupathi) म्हणजे कन्नड भाषेमध्ये ‘छोटा तिरुपती’ होय! आंध्र प्रदेशातलं हे मंदिर श्रीहरी विष्णू म्हणजेच वेंकटेश्वराला समर्पित आहे. हे मंदिर दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यात असलेल्या बंगळुरू शहराच्या बाहेरच्या भागामध्ये मालूर तालुक्यातल्या हुबळी येथे आहे. द्रविडीयन वास्तुशैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरासारखेच मानले जाते. या मंदिरात श्रीहरी विष्णूंना व्यंकटेश्वर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांना अलमेलुमंगम्माच्या रुपात पूजलं जातं.

चिक्का तिरुपती (chikka tirupathi) हे मंदिर तालुक्याच्या मुख्य गावापासून म्हणजेच मालूरपासून १५ किलोमीटर म्हणजेच ९.३ मैल एवढ्या अंतरावर आहे. हे मंदिर दररोज सकाळी ६.३० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत खुलं असते. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी चार दैनंदिन विधी असतात. ब्रह्मोत्सव हा इथला प्रमुख सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात शनिवारच्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मंदिराच्या आसपासच्या परिसरात रथामधून मंदिराच्या प्रमुख देवतांच्या प्रतिमा ठेऊन मिरवणूक काढली जाते. या मंदिराची देखरेख आणि इथलं व्यवस्थापन इथलं प्रशासन मंडळ करतं.

(हेही वाचा – ST Strike : संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते यांनी केली पोलखोल)

मंदिराची आख्यायिका

या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, महाभारतातल्या पांडव दहनाच्या प्रसंगाच्या वेळी तक्षक नाग त्याला झालेल्या जखमांसह जंगलातून पळून गेला. त्याने अग्नीला त्याचं देवत्व गमावण्याचा शाप दिला. त्यानंतर पुढे महादेवाच्या सांगण्यावरून अग्नीने या प्रदेशात भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना केली आणि आपलं देवत्व पुन्हा प्राप्त करून घेतलं.

आणखी एक आख्यायिका अशीही आहे की, या गावाच्या प्रमुखाला एक स्वप्न पडलं. त्यानुसार त्याने तिथल्या स्थानिक तलावातून भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती बाहेर काढली. बैलगाडीतून ती मूर्ती नेत असताना एका ठिकाणी गाडी तुटून मूर्ती तिथेच रुतली. त्याच ठिकाणी चिक्का तिरुपतीचं मंदिर बांधण्यात आलं. ऐतिहासिक नोंदीनुसार या प्रदेशावर पूर्वी गंगा, चोळ आणि होयसल राजवंशांनी राज्य केलं होतं. या ठिकाणाला कनिकरणहल्ली आणि नंतर कनकपुरा असं म्हटलं जायला लागलं.

(हेही वाचा – Andhra Pradesh Rain: पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा!)

मंदिराचं आर्किटेक्चर

हे मंदिर होस्कोटेपासून २५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हे व्यंकटेश्वर मंदिर द्रविड वास्तुकलेनुसार बांधलं गेलं आहे. म्हैसूर इथे नोंद केलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर काही शतके जुने असल्याचे समजतं. या मंदिरात पाच स्तरांचा गोपुरा आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला मंदिराचे टाके आहेत. मध्यवर्ती मंदिरामध्ये व्यंकटेश्वराची प्रतिमा उभ्या स्थितीत आहे. मंदिराभोवती दोन चौक आहेत.

प्रवेशद्वारापासून ते मध्यवर्ती मंदिरापर्यंत असलेला ध्वजस्तंभ हा अर्पण स्तंभ आणि गरुड मंडपाच्या माध्यमातून उभारलेला आहे. तसंच गरुडाची प्रतिमा हे गरुड मंडपामध्ये व्यंकटेश्वराच्या प्रतिमेसमोर ठेवलेली आहे. हल्लीच्या आधुनिक काळात हे मंदिर कर्नाटक सरकारच्या धार्मिक व्यवस्थापन या विभागाद्वारे प्रशासित केलं जातं. (chikka tirupathi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.