चेहऱ्याच्या सगळ्या समस्या दूर करणार ‘हा’ बहूगुणी साबण; कसा बनवायचा घरी? वाचा

363
चेहऱ्याच्या सगळ्या समस्या दूर करणार 'हा' बहूगुणी साबण; कसा बनवायचा घरी? वाचा
चेहऱ्याच्या सगळ्या समस्या दूर करणार 'हा' बहूगुणी साबण; कसा बनवायचा घरी? वाचा

कडूलिंबाची पाने (Neem leaves) जंतुविरोधी (Antibiotics) आणि बुरशीविरहीत (Fungus free) गुणांनी भरपूर संपन्न असतात. यामुळेच आधीच्या काळात सौंदर्य प्रसाधनांसाठी (Cosmetics) कडूलिंबाच्या पानांचा उपयोग केला जात असे. म्हणून आम्ही तुमच्याबरोबर कडूलिंबाच्या पानांपासून साबण बनवण्याची कृती शेअर करणार आहोत. कडूलिंबाच्या साबणाच्या वापराने चेहऱ्यावरील काळे डाग (black spots), तेलकटपणा (Oiliness), संसर्ग (infection) होणे यांसारख्या समस्या दूर होतात. कडूलिंबाच्या पानांचा साबण चेहऱ्याच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करतो. तसेच अवेळी भेडसावणारी वयवाढीची समस्या (Aging problem) कमी करते. तर चला जाणून घेऊयात कडूलिंबाच्या पानांचा साबण कसा बनवतात…

साहित्य

  • २ कप कडूलिंबाची पाने (Neem leaves)
  • ग्लिसरीन साबण (Glycerin soap)
  • १/२ चमचा एसेंशिअल ऑइल (Essential oil) (पर्यायी)
  • साबण बनवण्याचा साचा

(हेही वाचा – Saree : वनस्पतीपासून बनवली साडी; जगातला पहिला प्रयोग

कृती

कडूलिंबाची पाने निवडून ती स्वच्छ धुतल्यानंतर या पानांना मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची घट्ट पेस्ट करुन घ्यावी. ग्लिसरीन साबणाला किसुन किंवा सुरीने त्याचे छोटे छोटे तुकडे एका भांड्यात जमा करुन मायक्रोव्हेव्ह किंवा गॅसवर वितळवून घ्यावे. यानंतर कडूनिंबाच्या पानांच्या पेस्टमध्ये सुगंधी तेलाचे काही थेंब, आवश्यकतेनुसार चिमुटभर हळद पावडर टाकून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे. वितळवलेल्या साबणामध्ये वरील मिश्रण घालून व्यवस्थित एकजीव केल्यानंतर या मिश्रणाला काही वेळासाठी पुन्हा एकदा मायक्रोव्हेव्ह किंवा गॅसवर वितळून घ्यावे. साबण बनवण्याच्या साच्यात वरील तयार मिश्रण ओतून फ्रिजमध्ये ४ ते ५ तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवायचे. अशा प्रकारे घरच्या घरी कडुलिंबाच्या पानांचा साबण तयार करा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.