Honor 90 Pro : Amazon Great India Festival मध्ये हॉनरचा ‘हा’ फोन मिळतोय २५,७४९ रुपयांमध्ये 

Honor 90 Pro : हॉनर ९० प्रो वर ॲमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल अंतर्गत तुम्ही १२,००० रुपयांची सूट मिळवू शकता. 

23
Honor 90 Pro : Amazon Great India Festival मध्ये हॉनरचा ‘हा’ फोन मिळतोय २५,७४९ रुपयांमध्ये 
Honor 90 Pro : Amazon Great India Festival मध्ये हॉनरचा ‘हा’ फोन मिळतोय २५,७४९ रुपयांमध्ये 

ऋजुता लुकतुके

गेल्याच महिन्यात हॉनर कंपनीने (Honor 90 Pro) भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केलं होतं. हॉनर ९० आणि ९० प्रो हे दोन नवीन फोन त्यांनी भारतात लाँच केले. आता कंपनीच्या या हाय-एंड फोनवर ॲमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल अंतर्गत मोठी सूट मिळत आहे.

कंपनीने या फेस्टिव्हलमध्ये हॉनर ९० घेणाऱ्यांसाठी तब्बल ७,००० रुपयांची सवलत दिली आहे. तर एसबीआय कार्डावर फोनची खरेदी केलीत तर तुम्हाला अतिरिक्त ५,२५० रुपयांची सूट मिळेल. आणि मग फोनची किंमत २५,७४९ रुपये इतकी होईल. याशिवाय हा फोन मासिक हप्त्यांवर घेण्याची सोयही कंपनीने करून दिली आहे.

(हेही वाचा-Ind vs Ban : बांगलादेश विरुद्ध भारताला विजयी चौकाराची संधी )

हॉनर ९० प्रो चे फिचर्स 

१२० हर्ट्झचा एमोल्ड डिस्प्ले या फोनमध्ये आहे. त्याची प्रखरता तसंच स्पष्टता १६०० निट्स पीकची आहे. या फोनमध्ये ३ रेअर कॅमेरा आहेत. यातला प्राथमिक कॅमेरा हा २०० मेगापिक्सल क्षमतेचा आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सल क्षमतेची एक अल्ट्रावाईड लेन्सही देण्यात आली आहे. तर सेल्फी कॅमेराही ५० मेगापिक्सलचा आहे.

हॉनर ९० (Honor 90 Pro) फोन ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज तसंच १२ जीबी रॅम वर ५१२ जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. आणि या दोन्ही फोनची किंमत अनुक्रमे ३७,९९९ व ३९,९९९ इतकी आहे. सध्या ॲमेझॉन फेस्टिव्हल दरम्यान यात मोठी सूट उपलब्ध आहे.

या फोनमध्ये दोन सिम वापरता येतात. एमराल्ड ग्रीन, डायमंड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लॅक रंगात हे फोन उपलब्ध आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.