Honda CB1000R : होंडाची १५ लाखांची बाईक तुम्ही बघितली का? 

होंडा कंपनी आपली नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. मार्च २०२४ मध्ये बाजारात येणारी ही बाईक आतापासून चर्चेत आहे. कारण, तिची किंमत असेल तब्बल १५ लाख रुपये

25
Honda CB1000R : होंडाची १५ लाखांची बाईक तुम्ही बघितली का? 
Honda CB1000R : होंडाची १५ लाखांची बाईक तुम्ही बघितली का? 

ऋजुता लुकतुके

होंडा कंपनी आपल्या सीबी १००० आर (Honda CB1000R) या बाईकच्या मॉडेलमध्ये अधिक सुधारणा करून ते नव्याने लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन बाईकबद्दल सगळीकडे उत्सुकता निर्माण झाली आहे. कंपनीने २०२१ मध्ये सी१०००आर हे मॉडेल पहिल्यांदा बाजारात आणलं. यंदा त्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत.

बाईकचा हेडलाईट अधिक प्रखर दिसेल असा बदलण्यात आलाय. तर ॲल्युमिनिअम सब-फ्रेमही आधुनिक दिसेल अशी बदलण्यात आलीय. या बाईकचं डिझाईन वाय शेप असेल.

(हेही वाचा-Mumbai Bank : मुंबई बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्याची परवानगीची मागणी)

बाकी बाईकच्या इंजिनमध्ये फारसे बदल नाहीत. ४ सिलिंडर इंजिन ९९८ सीसी क्षमतेचं आहे. या बाईकमध्ये चार मोड असतील. रेन, स्टँडर्स, स्पोर्ट आणि युजर असे हे मोड आहेत. यातील युजर मोड तुम्हाला हवा तसा तुम्ही सेट करू शकता. तर पॉवर मोडही तीन प्रकारचे असतील.

सुझुकी कटाना या बाईकशी स्पर्धा करण्यासाठी होंडाने ही बाईक बाजारात आणण्याचा निर्णय घेतला होता. सगळे आधुनिक फिचर्स असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत आहे १४,४६,००० रुपये. बाईक १७ किलोमीटरचं ॲव्हरेज देते असा दावा कंपनीने केला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.