hinduja hospital mumbai : हिंदुजा हॉस्पिटलबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? म्हणूनच हे आहे सर्वोत्कृष्ट रुग्णालय!

71
hinduja hospital mumbai : हिंदुजा हॉस्पिटलबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? म्हणूनच हे आहे सर्वोत्कृष्ट रुग्णालय!

परमानंद दीपचंद हिंदुजा हे हिंदुजा हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. हिंदुजा ग्रुपचं असं मत आहे की, आरोग्य आणि शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. त्यांच्या या दृढ विश्वासामुळेच त्यांनी १९५४ साली “नॅशनल हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी” ची स्थापना केली होती. हिंदुजा हे हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्णांच्या गरजा जाणून घेण्यासाठी, ते आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना कम्फर्टेबल असल्याची खात्री करण्यासाठी तसंच सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळताहेत ना याची खात्री करण्यासाठी दररोज हॉस्पिटलला भेट देत असत. (hinduja hospital mumbai)

गरीब आणि गरजू लोकांकडे ते विशेष लक्ष देत असत. हिंदुजा यांनी रुग्णांना मोफत उपचारासाठी पात्र ठरण्यासाठी रुग्णांची तपासणी करण्याची एक अनोखी पद्धत शोधली होती. त्यांना माहिती होतं की, लोक आपल्या श्रद्धास्थानाचं नाव घेऊन कधी खोटं बोलू शकणार नाहीत. म्हणून ते रूग्णांना त्यांच्या गुरूंच्या किंवा देवांच्या समोर हे प्रामाणिकपणे कबूल करायला लावायचे की, त्यांच्याकडे उपचारांच्या बिल भरण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाहीय. अशाप्रकारे जे लोक प्रामाणिकपाने खरं बोलायचे त्यांनाच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराचा लाभ मिळायचा. (hinduja hospital mumbai)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : पराभूत,तरीही खरे योध्दा ठरले शिवसेनेचे दोन शिलेदार)

हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी पुढील सेवा उपलब्ध आहेत : 
  • कॅन्सर केअर सेंटर
  • कार्डियाक केअर सेंटर
  • न्यूरो केअर केंद्र
  • ऑर्थोपेडिक केअर सेंटर
  • रोगांचे तज्ज्ञ आणि त्यांच्या सेवा
  • स्पेशालिटी क्लिनिक्स
  • केअर होम
  • अल्पकाळ मुक्काम सेवा
  • हेल्थ फर्स्ट-प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी केंद्र
  • हेल्थ ब्लॉग
  • दूरसंचार सुविधा
  • ऑनलाइन सर्व्हिसेस

(हेही वाचा – Garbage On Railway Track: रेल्वे रूळांवरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ऑक्टोबर महिन्यात तब्बल १२० टन कचऱ्याची विल्हेवाट)

हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाची धोरणे पुढीलप्रमाणे :

हॉस्पिटल सेवांसाठी बिल किंवा ठेवी म्हणजेच डिपॉझिट पेमेंट प्रक्रियेसाठी..

  • ऍडव्हान्स/बिल/डिपॉझिट पेमेंट प्रक्रिया ही तुमच्या नियोजित सेवेच्या जसं की, शस्त्रक्रिया आणि उपचाराची प्रक्रिया यांच्या दिलेल्या तारखेच्या किमान दोन दिवस आधी केली पाहिजे.
  • जर देय दिनांक तसंच शस्त्रक्रिया आणि उपचाराच्या प्रक्रियेच्या तारखेच्या दिवशी सुट्टी किंवा बँक हॉलिडे असेल तर तुम्ही पेमेंट करण्यासाठी उपचार किंवा शस्त्रक्रियेच्या तीन दिवस आधीची तारीख निवडणं गरजेचं आहे.
  • हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पेमेंट करण्यासाठी भारतीय चलनाचा वापर केला जातो.
  • ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेमध्ये व्यवहार पूर्ण केल्यानंतरच पोचपावती तयार होते.
हिंदुजा हॉस्पिटलला भेट द्यायची असल्यास पुढील कागदपत्रं व्हेरिफिकेशनसाठी सोबत असायलाच हवी.
  • वैयक्तिक ओळख पटण्यासाठी वैध फोटो ओळखपत्र किंवा पुरावा कायद्यानुसार स्वीकार्य असललेलं ओळखपत्र.
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी पुरावा कायद्यानुसार वैध असलेलं ओळखपत्र.
  • क्रेडिट कार्डची रीतसर सही केलेली फोटो कॉपी.
  • ऍक्नॉलेजमेंट रिसिप्ट.

(हेही वाचा – Mumbai Terror Attack : राज्यपालांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन)

शस्त्रक्रियेची किंवा उपचारांची ठरलेली वेळ रुग्णाकडून रद्द केली गेली किंवा पुढे ढकलली गेली तर रुग्णाने भरलेली डिपॉझिटची रक्कम जप्त केली जाईल.

केवळ सर्जन किंवा काऊन्सलर हेच वैद्यकीय कारणास्तव शस्त्रक्रिया रद्द करू शकतात किंवा पुढे ढकलू शकतात. हॉस्पिटलकडून शस्त्रक्रिया किंवा उपचारांच्या दिनांकामध्ये बदल झाला तरच डिपॉझिटची रक्कम रुग्णाला पण केली जाते. (hinduja hospital mumbai)

कॅन्सलेशन प्रोसेस खालीलप्रमाणे आहे :
  • काऊन्सिलर आणि प्रवेशाच्या काउंटरला सूचित करावं. शस्त्रक्रियेच्या किंवा उपचार घेण्यासाठी ठरलेल्या दिनांकाच्या किमान २ दिवस आधी सूचना द्यावी.
  • रिफंड पेमेंट करण्यापूर्वी रद्दीकरणाची पुष्टी करण्यासाठी काऊन्सिलर कडून एक टीप घेणं गरजेचं आहे.
  • हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने डिपॉझिटच्या परताव्याला मान्यता दिली तर मूळ आणि परताव्याच्या व्यवहारावर हॉस्पिटलने रुग्णाच्या क्रेडिट कार्ड बँकेला दिली जाणारी रक्कम ही डिपॉझिटच्या रकमेनुसार ५% पेक्षा जास्त नसेल.
  • हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना हॉस्पिटलच्या शुल्कानुसार पैसे देण्याचं कबूल करण्याऱ्या हमीपत्रावर सही करण्याची विनंती केली जाते.
  • रुग्ण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याच्या वेळी रुग्णांनी आधी पेमेंट केलेल्या सर्व मूळ पावत्या सोबत आणाव्यात. मूळ पावत्या असल्याशिवाय रकमेचं कोणतंही समायोजन केलं जात नाही. पावत्या मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. तसंच सर्व पावत्या रुग्णाच्या नावावर आहेत याची खात्री करावी. पावत्यांवर इतर कोणतेही महसूल शिक्के चिकटवले जात नाहीत.
  • रुग्णालयाच्या बिलावर कोणत्याही प्रकारचा अधिभार लावला जात नाही. पण तरीही सर्व परदेशी नागरिक आणि अनिवासी भारतीयांना एकूण बिलावर २५% अधिभार लावला जाईल.
  • डिपॉझिटची रक्कम आणि इतर सर्व शुल्क सूचना दिल्याशिवाय बदलू शकतात.
  • समान शस्त्रक्रिया पॅकेजसाठी बिलिंग वर्ग प्रीमियम ते मानक बदलण्यासाठी कॉउन्सिलर किंवा सर्जनची संमती घेणं गरजेचं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.