grand island : गोव्यामध्ये ग्रॅंड आयलॅंड कुठे आहे? आणि तिथे तुम्ही काय काय धम्माल करु शकता?

89
grand island : गोव्यामध्ये ग्रॅंड आयलॅंड कुठे आहे? आणि तिथे तुम्ही काय काय धम्माल करु शकता?

गोव्याचा सागरकिनारा कित्येक लहान लहान बेटांनी सजलेला आहे. असंच एक बेट म्हणजे ग्रँड आयलँड. या बेटाचं इल्हा गांद्रे असं एक पोर्तुगीज नावही आहे. या बेटाला मंकी बीच असंही म्हणतात. याव्यतिरिक्त हे बेट बॅट आयलँड म्हणूनही ओळखलं जातं. हे बेट गोव्याच्या वास्को-द-गामा या शहराच्या बंदरापासून साधारणपणे १ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

ग्रँड आयलँड स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, डॉल्फिन पाहणे, मासेमारी किंवा फक्त पोहणे यासारख्या जलक्रीडांसाठी अतिशय लोकप्रिय आहे. (grand island)

(हेही वाचा – Bhiwandi तून तब्बल ८०० किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त)

ग्रँड आयलँडवर फिरण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क

ग्रँड आयलँड या बेटावर फक्त दिवसा फिरण्यासाठी तुम्हाला परवानगी मिळते. कारण हे बेट अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या अधिपत्याखाली आहे. या बेटावर कोणत्याही प्रकारचे हॉटेल्स, वसतिगृहे, होमस्टे किंवा इतर कोणत्याही प्रकारची पर्यटकांसाठी राहण्याची सोय केलेली नाही. या बेटावर पर्यटकांना रात्री राहण्याची परवानगी दिली जात नाही.

खरंतर कोणत्याही टुरिस्ट बोटीने दुपारी ३ वाजता या बेटावरून बाहेर पडणं हे कायद्याने सक्तीचं आहे. वेळेच्या निर्बंधाव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रँड आयलँड या बेटावरची टूर फक्त ऑक्टोबर ते जून या कालावधीतचं सुरू असते. याचं कारण असं की, पावसाळा सुरू झाल्यावर इथे सर्व ठिकाणी पाणी तुंबते. तसंच इथली दृश्यमानता कमी होते. इथे पावसाळ्याच्या काळात कुठलीही गोष्ट स्पष्ट दिसत नाही. ग्रँड आयलँड या बेटावर फिरायला जायचं असेल तर तुम्ही फक्त अर्धा किंवा जास्तीत जास्त एक दिवसाची टूर करू शकता.

(हेही वाचा – Thackeray group Banner: काय आहे हिंदुत्व? ठाण्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी)

ग्रँड आयलँडबद्दल काही मनोरंजक तथ्ये

ग्रँड आयलँडविषयी जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे. तसंच या बेटावर मज्जा करण्यासाठीही बरंच काही आहे. तुम्ही ग्रँड आयलँड येथे ज्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता, त्या खालीलप्रमाणे –

  • ग्रँड आयलँड हे बेट मुरमुगाव द्वीपकल्पांत वसलेलं आहे. तसंच हे बेट भारतीय नौदलाच्या मालकीच्या असलेल्या इल्हा डी साओ जॉर्ज किंवा सेंट जॉर्ज या बेटाच्या सीमेवर आहे.
  • ग्रँड आयलँड बेटावरची दुपार विशेषतः उन्हाळ्यातली, भयंकर उष्णतेने भरलेली असू शकते. खासकरून या काळामध्ये तुम्ही हायड्रेशन आणि सूर्यापासून संरक्षणाच्या बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अशावेळी हाय एसपीएफ असलेलं सनस्क्रीन लोशन लावणं किंवा टोपी वापरणं हे खूप महत्त्वाचं असतं. विशेषत: जेव्हा तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला जाणार असाल त्यावेळी आपल्यासोबत थोडं पाणी आणि स्नॅक्स घेऊन जाणं केव्हाही चांगलं.
  • ग्रँड आयलँडवर येणारे अनेक टूरिस्ट प्रत्यक्षात तिथे थांबत नाहीत. त्याचं कारण असं की कारण बेटाच्या अगदी जवळ पाण्याची पातळी खोल आहे.
  • या बेटावर किनाऱ्यालगत समुद्राची खोली ७ मीटर ते २० मीटर इतकी आहे. हे बेट स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंग या दोन्ही वॉटरस्पोर्ट्ससाठी चांगले आहे. स्नॉर्कल्सना इथे त्यांच्या टूर ऑपरेटरकडून मास्क, डायव्हिंग किट, माऊथपीस आणि ऑक्सिजन सिलेंडर दिलं जातं.
  • या बेटापासून जवळच असलेली उम्मागुम्मा रीफ ही डाईव्ह साईड नव्या स्विमर्ससाठी आणि डायव्हर्ससाठी एक छान ठिकाण आहे. या ठिकाणी लॉबस्टर, लहान कासव, समुद्री काकडी, व्हाईट-टिप रीफ शार्क आणि सुई फिश यांसारखे सागरी जीव आहेत.
  • ऍडव्हान्स डायव्हर्सना पाहण्यासाठी डेव्ही जोन्स लॉकर जहाज हे एक बुडालेलं जहाज आहे. तुमच्याकडे मजबूत स्नायू आणि मोठ्या सागरी प्रवाहातून पोहण्याची क्षमता असेल तर तुम्ही थोडं खोलवर जाऊन ते जहाज पाहू शकता. याव्यतिरिक्त सेलिंग रॉक नावाची ऍडव्हान्स डायव्हर्ससाठी आणखी एक स्कूबा डायव्हिंग साइट आहे.
  • तुमच्या टूरदरम्यान तुम्ही ग्रँड आयलँड इथे पोहोचण्याआधी वाटेत सॅन जोस आणि पेन्जुएनो यांसारखी इतर बेटं पाहू शकता. तसंच तुम्ही समुद्रातून गोवा जेल आणि अगुआडा किल्लादेखील पाहू शकता. (grand island)

(हेही वाचा – Pooja Khedkar ला उमेदवारी रद्द करण्याचा आदेश मिळालाच नाही ?; यूपीएससी दिल्ली न्यायालयात म्हणाले…)

ग्रँड आयलँडवर कसे पोहोचू शकता..

ग्रँड आयलँड हे बेट गोव्याच्या मुख्य भूभागापासून साधारणपणे १ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. अरबी समुद्रात असलेल्या या बेटावर पोहोचण्याचा शेवटचा मार्ग बोटीने असला तरी गोव्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

फ्लाईट :

वास्को द गामाच्या जवळच्या शहरात पोहोचण्यासाठी तुम्ही मोपा इथल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कॅब घेऊ शकता. कॅबने ६० किलोमीटर एवढं अंतर कापण्यासाठी दीड तास लागतो. सर्वात जवळचं विमानतळ म्हणजे दाबोलिम विमानतळ हे आहे. हे विमानतळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. तसंच वास्को इथल्या बायना बीचपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे. इथून ग्रँड आयलँडला जाण्यासाठी बोटींचा प्रवास सुरू असतो.

रेल्वे :

बायना बीचचं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे वास्को-दा-गामा हे रेल्वे स्टेशन आहे. साधारण ५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. इथून ग्रँड आयलँडच्या सुरुवातीच्या बिंदूवर पोहोचण्यासाठी साधारणपणे १५ मिनिटं लागतील.

बस :

तुम्हाला बसने या बेटावर जायचं असेल तर बायना बीचवर जाण्यासाठी सर्वात जवळचा बस स्टॉप म्हणजे वास्को केटीसी बस स्टँड हा आहे. तुम्हाला बायना बस स्टँडला जाणारी बस मिळाली तर ३ किलोमीटर अंतर कापण्यासाठी फक्त १० मिनिटे एवढा वेळ लागतो.

कार :

ग्रँड आयलँडवर गाड्या पोहोचवता येत नाहीत. त्यामुळे बेटावर जाण्याआधी तुम्हाला कोणतीही भाड्याची कार किंवा तुमचं वैयक्तिक वाहन वास्को-द-गामा येथे सोडावं लागेल. बोर्डिंग पॉईंटवर पोहोचण्यासाठी तुम्ही गोव्यातल्या कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांकडून खाजगी कॅब भाड्याने घेऊ शकता.

बाईक किंवा स्कूटी :

बाईक किंवा स्कूटरही ग्रँड आयलँड बेटावर नेले जाऊ शकत नाहीत. बाईक किंवा स्कूटर आपल्या ग्रँड आयलँडला जाणाऱ्या टूर बोटीमध्ये चढण्यापूर्वी वास्को-द-गामा येथे सोडले पाहिजे. (grand island)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.