prince of wales museum आहे तरी कुठे आणि काय आहे खासियत?

63
prince of wales museum आहे तरी कुठे आणि काय आहे खासियत?

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (prince of wales museum) ऑफ वेस्ट इंडिया हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतंय का? नाही ना? छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचं पूर्वीचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्ट इंडिया असं होतं. या वस्तुसंग्रहालयामध्ये अगदी पुरातन काळापासून ते आधुनिक भारतापर्यंतच्या इतिहासाचे सगळे दस्तऐवज आणि इतर पुरावे जतन केलेले आहेत. याव्यतिरिक्त इथे परदेशातल्याही इतिहासाचे काही पुरावे जतन करून ठेवण्यात आले आहेत.

इतिहास

१९०४ साली मुंबईतल्या काही मान्यवर नागरिकांनी प्रिन्स ऑफ वेल्स (prince of wales museum)  म्हणजेच पाचवा जॉर्ज याच्या १४ ऑगस्ट १९०५ साली देण्यात येणाऱ्या मुंबई इथल्या भेटीच्या स्मरणार्थ त्याच्या नावाने हे वास्तू संग्रहालय उभारलं होतं. ११ नोव्हेंबर १९०५ साली प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते या वास्तू संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली.

(हेही वाचा – nehru planetarium चे तिकीट दर किती आहे? माहितीय का?)

१९१५ साली या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. पण पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ‘बाल कल्याण केंद्र’ आणि ‘लष्करी रुग्णालय’ म्हणून या इमारतीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर पुढे १९२० साली ही इमारत समितीकडे सोपवण्यात आली. १० जानेवारी १९२२ साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांची पत्नी लेडी लॉईड हिच्या हस्ते ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्ट इंडिया’ या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.

ही इमारत शहरातली ग्रेड वन इमारत ठरली. १९९० साली भारतीय हेरीटेज सोसायटीच्या बॉम्बे चॅप्टरने या हेरीटेज इमारतीच्या देखभालीसाठी ‘अर्बन हेरीटेज अवॉर्ड’ प्रदान केला होता. १९९५ साली शहराचं बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असं ठेवण्यात आलं. त्यानंतर १९९८ साली या वास्तू संग्रहालयाचं नाव बदलून हिंदू साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ असं ठेवण्यात आलं. (prince of wales museum)

(हेही वाचा – nehru science centre : काय आहे नेहरु सायन्स सेंटरमधील आकर्षण?)

संग्रह

या संग्रहालयात जवळजवळ पन्नास हजार वस्तू आणि कलाकृतींचा समावेश आहे. या वास्तू संग्रहालायचं कला विभाग, पुरातत्त्व विभाग आणि नैसर्गिक इतिहास अशा तीन भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. २००८ साली या संग्रहालयाने ‘कार्ल आणि मेहेरबाई खंडालावाला संग्रह’ तसंच ‘भारताची नाणी’ अशा दोन गॅलरी प्रस्थापित केल्या.

कला विभाग

वास्तू संग्रहालयाच्या कला विभागामध्ये सर पुरुषोत्तम मावजी यांचा संग्रह, तसंच सर रतन टाटा आणि सर दोराब टाटा यांनी दान केलेला संग्रह ठेवण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त नेपाळ-तिबेट भागातून आणलेली नृत्य मुद्रेतली कृष्णमूर्ती देखील आहे. तसंच या वास्तू संग्रहालयाच्या लघुचित्र दालनामध्ये राजस्थानी, पहाडी, डेक्कनी, मुघल चित्रांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त या विभागामध्ये वेगवेगळ्या धातूंची कलाकुसर केलेले दागिने भांडी इत्यादी ठेवलेले आहेत. तसंच नेपाळी आणि तिबेटी कलांचेही नमुने तुम्हाला पाहायला मिळतील. (prince of wales museum)

(हेही वाचा – Crime News: बदलापूरात चिमुरडी पून्हा ठरली वासनेचा बळी! पित्यानेच केले पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार)

पुरातत्त्व विभाग

या विभागामध्ये तुम्हाला पुणे इथल्या म्युझियम मधून हस्तांतरण केलेली शिल्पे, नाणी पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त सिंधू संस्कृतीतली वजनमापे, हत्यारे, दागिने या सर्व गोष्टी तुम्हाला पुरातत्त्व विभागामध्ये पाहायला मिळतील.

नैसर्गिक इतिहास विभाग

नैसर्गिक इतिहास विभागाचं संवर्धन करण्यास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने म्युझियम ट्रस्टला नैसर्गिक इतिहास विभाग तयार करण्यात मदत केली. या विभागात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहता येतील. (prince of wales museum)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.