बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा नाहीतर…

192
बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा नाहीतर...
बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा नाहीतर...

उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर पडायची कोणाचीही इच्छा नसते. मात्र अत्यावश्यक कारणांमुळे अनेकदा भर उन्हाचा सामना करत घराबाहेर पडावे लागते. तेव्हा मदतीला धावून येते ते सनस्क्रीन. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन्स उपलब्ध आहेत. पावडर, लोशन, क्रीम, स्प्रेच्या स्वरूपातील वेगवेगळ्या ब्रॅन्डचे सनस्क्रीन्स उपलब्ध आहेत.

सनस्क्रीन आवश्यक आहे कारण…

खरंतर घराबाहेर पडताना नेहमीच सनस्क्रीन लावायला हवे. नेहमी लावणे शक्य नसेल तर किमान उन्हाळ्याच्या दिवसात कामानिमित्त बाहेर पडताना सनस्क्रीन लावयलाच हवे. ढोबळमानाने सांगायचे झाले तर सूर्यकिरणात दोन प्रकारचे घटक असतात. त्यात यूव्हीए आणि यूव्हीबी अशा प्रकारची अतीनील किरणे असतात. यूव्हीए किरणांची तरंगलांबी जास्त असल्यामुळे ती त्वचेत खोलवर जाऊन नुकसान करतात. तर यूव्हीबी किरणांमुळे त्वचेच्या वरच्या थराला म्हणजे एपिडर्मिसला नुकसान पोहोचते. या दोन घटकांमुळे सनबर्नची समस्या उद्भवते. जास्त वेळ उन्हात राहिले तर त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा अकाली म्हातारी होणे, त्वचेवर काळे डाग पडणे यासारखी लक्षणे दिसून येतात. या किरणांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

(हेही वाचा – हृदयविकार टाळण्यासाठी ‘हे’ कराच, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल)

हे लक्षात ठेवा…

  • त्वचेवर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. मात्र त्याचे प्रमाण मर्यादेत असायला हवे. बोटाच्या अग्रभागावर राहिल तितकेच घेऊन लावावे.
  • सनस्क्रीनचा ‘एसपीएफ’ जितका अधिक, तेवढं सन प्रोटेक्शन जास्त.
  • उन्हात वारंवार घाम येतो. त्या घामासोबत सनस्क्रीन निघून जाते. त्यामुळे आवश्यकतेनुसार दिवासातून अनेकदा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
  • तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन घ्यावे. उदा. त्वचा तेलकट असेल तर ‘लाईटवेट’ किंवा ‘ऑईल फ्री’ लिहिले असेल तेच सनस्क्रीन विकत घ्यावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.