Milk Benefits : रात्री झोपण्यापूर्वी दूध पिता ?; हे वाचा…

25
Milk Benefits : रात्री झोपण्यापूर्वी दूध पिता ?; हे वाचा...
Milk Benefits : रात्री झोपण्यापूर्वी दूध पिता ?; हे वाचा...

रोज दूध पिणे शरीरासाठी आरोग्यदायी असल्याचे आपल्याला माहितीच आहे. (Milk Benefits) दुधामुळे आरोग्य चांगले राहते. हाडे मजबूत होतात. थकवा दूर होऊन शांत, गाढ झोप लागण्यासही दुधामुळे मदत होते. दुधात असलेल्या पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर संतुलित राहण्यास मदत होते. तसेच पोट बराच काळ भरलेले राहत असल्यामुळे लवकर भूक लागत नाही. रात्री भूक लागली, तर ती शमवण्यासाठी दूध हा एक चांगला पर्याय आहे.

(हेही वाचा – Gelatin Sticks Seized : मुंब्रा रेतीबंदर किनारी जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्याने खळबळ)

रात्री झोपण्याआधी गरम दूध पिण्याचे फायदे
  • दुधात असलेल्या कॅल्शियम आणि प्रोटीनच्या मात्रेमुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगवान होते आणि फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच अंशी मदत मिळते.
  • दुधात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक ब्लडप्रेशर नियंत्रित राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या समस्येते दिलासा मिळतो.
  • मन शांत असते, तेव्हा झोपही चांगली लागते. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते. त्यामुळे झोपेच्या हॉर्मोनची पातळी वाढवण्यास मदत मिळते. त्यामुळे डोके शांत होते आणि झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्याच्या एक तास आधी दूध प्यायल्यास झोप चांगली लागते. (Milk Benefits)
  • दुधात कॅसिन ट्रिप्टिक हायड्रोलायजेट (सीटीएच) हे पेप्टाइड्सचे मिश्रण असते. हे मिश्रण तणाव दूर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. त्यामुळे चांगली झोप लागण्यासाठीही ते उपयुक्त ठरते.
  • सीटीएचमध्ये असलेली काही खास पेप्टाइड्स अलीकडेच शोधून काढण्यात आली आहेत. त्यांचा उपयोग आगामी काळात झोप न येण्याच्या समस्येवर उपचारांसाठी केला जाऊ शकतो. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्री’मध्ये या संदर्भातल्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

या सगळ्याचा विचार करता रात्री झोपताना गरम दूध पिणे श्रेयस्कर आहे. अर्थात शरिरावर कोणताही नवा प्रयोग करतांना डाॅक्टरांच्या सल्ल्याने सुरुवात करणे केव्हाही उत्तम ! (Milk Benefits)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.