Data Scientist Salary : डेटा सायन्टिस्ट होऊन तुम्ही महिन्याला ‘इतके’ रुपये कमावू शकता 

Data Scientist Salary : डेटाच्या वाढत्या महत्त्वामुळे डेटा सायन्टिस्टला भारतात सध्या मागणी आहे

83
Data Scientist Salary : डेटा सायन्टिस्ट होऊन तुम्ही महिन्याला ‘इतके’ रुपये कमावू शकता 
Data Scientist Salary : डेटा सायन्टिस्ट होऊन तुम्ही महिन्याला ‘इतके’ रुपये कमावू शकता 
  • ऋजुता लुकतुके

माहिती तंत्रज्जान क्षेत्रात आणि माहितीच्या या युगात डेटा सायन्टिस्टना सध्या भलतीच मागणी आहे. इंटरनेटवर आणि विविध सर्वेक्षणातून विविध प्रकारची माहिती महाजालावर उपलब्ध होत असते. या माहितीचं नीट आकलन करून ती संकलित करण्याची आणि योग्य ठिकाणी वापर करून त्यातून समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करायचं अशी अवघड जबाबदारी डेटा सायन्टिस्टची असते. जवळ जवळ महत्त्वाच्या सर्व टेक कंपन्यांना डेटा सायन्टिस्टची गरज असते. अनुभव, पात्रता यांचा निकष सध्या न लावता डेटा सायन्टिस्टचा देशातील सरासरी पगार सध्या वार्षिक १० लाख रुपये इतका आहे. अर्थातच कंपनी, अनुभव, पात्रता आणि कौशल्य यानुसार यात फरक पडतो. (Data Scientist Salary)

(हेही वाचा- लाडकी बहीण योजनेत काही कमी पडू देणार नाही; DCM Ajit Pawar यांची ग्वाही)

ग्लासडोअर या वेबसाईटनुसार, भारतात नुकती सुरुवात करणाऱ्या ट्रेनी डेटा सायन्टिस्टचा पगार रासरी ४.९६ लाख रुपये इतका असू शकतो. तो अनुभवानुसार ३८ ते ५० लाख रुपये वार्षिक पर्यंत जाऊ शकतो. या क्षेत्रातील तुमचं कौशल्य डेटा ॲनालिसिसचं कौशल्य, मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिट आणि एसक्यूएलचा प्रभावी वापर, पायथन आणि आर ही सॉफ्टवेअर वापरणं यावरून ठरतं. ही कौशल्य असतील तर सुरुवातीलाच तुम्हाला ८.०४ रुपये इतका वार्षिक पगार मिळू शकतो. (Data Scientist Salary)

खाजगी तसंच सरकारी कंपन्यांमध्येही डेटा सायन्टिस्टची गरज असते. टेक कंपन्या ही सेवा तुम्हाला पुरवतात. किंवा खाजगी कंपन्या आपले स्वत:चे डेटा सायन्टिस्ट ठेवतात. गुगल, मायक्रोसॉफ्ट, डेलॉईट आणि सायट्रिक्स या कंपन्या भारतातही अगदी ताज्या दमाच्या डेटा सायन्टिस्टनाही संधी देतात. डेटा सायन्टिस्टना टीसीएस ही कंपनी सरासरी १६ लाख रुपये वार्षिक इतका पगार देते. तर सगळ्यात जास्त पगार मायक्रोसॉफ्ट ही कंपनी १७.०९ लाख रुपये इतका देते. (Data Scientist Salary)

(हेही वाचा- तुम्हाला माहीत आहे का ? मुंबईतील Girgaum Chowpatty कशासाठी प्रसिद्ध आहे जाणून घ्या, एका क्लिक वर  )

डेटा सोल्युशन्स सायन्टिस्टना वार्षिक ११.५१ लाख रुपये इतका पगार मिळतो. तर सर्वाधिक पगार डेटा इन्टलिजन्स मॅनेजर यांना वार्षिक १७ लाख रुपये इतका मिळतो. डेटा आर्किटेक्टलाही १६ लाख रुपये वार्षिक इतका सरासरी पगार मिळतो. १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर या क्षेत्रात तुम्हाला सरासरी वार्षिक २८ लाख रुपये इतका पगार मिळू शकतो. (Data Scientist Salary)

डेटा सायन्टिस्टचे ६ महिने ते १ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. ते ऑनलाईन पद्धतीनेही पूर्ण करता येतात. (Data Scientist Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.