cyber security course in hyderabad : हैदराबाद सायबर सिक्युरिटी कोर्सची फी किती आहे?

77
cyber security course in hyderabad : हैदराबाद सायबर सिक्युरिटी कोर्सची फी किती आहे?

सायबर सिक्युरिटी कोर्स, हैदराबाद

हल्लीच्या डिजिटल युगामध्ये सायबर सिक्युरिटीचं (cyber security) महत्त्व लक्षात घेऊन हैदराबादच्या हॅकर स्कूलने “हॅकर स्कूल सर्टिफाइड सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल” म्हणजेच HSCCSP हा कोर्स सुरू केला आहे. जे विद्यार्थी या डायनॅमिक कोर्सचा अभ्यास करतात त्यांना सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये उतरायला मदत मिळते.

हैदराबादच्या गतिमान शहरामध्ये दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीची भरभराट होत आहे. तसंच हुशार सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट्सची मागणी दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. हल्लीच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या जगामध्ये डिजिटल संसाधनांची आणि त्यांच्याशी जोडलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची हमी असणं ही मूलभूत गरज आहे. ही मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी हैदराबाद येथे काही आघाडीच्या सायबर सिक्युरिटी (cyber security) संस्था आहेत, त्या कित्येक सायबर सिक्युरिटी कोर्सेस आणि ट्रेनिंग प्रोग्राम ऑफर करतात. तसंच त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर यानडायनॅमिक डोमेनमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सगळी माहिती तुम्हाला देतात. (cyber security course in hyderabad)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी पाकला जाणार का? सचिव जय शाह काय म्हणाले?)

हॅकर स्कूल, हैद्राबाद

हैदराबादमध्ये अशा काही प्रतिष्ठित सायबर सिक्युरिटी संस्था आहेत ज्यांनी बेस्ट सायबर सिक्युरिटी कोर्स आणि जिनियस विद्यार्थी आपल्या संस्थेतर्फे समाजाला दिले आहेत. हैदराबादमधली अशीच एक सर्वोत्तम सायबर सिक्युरिटी कोर्स संस्था म्हणजेच हॅकर स्कूल होय. हॅकर स्कूलमध्ये हा कोर्स केला आणि ट्रेनिंग घेतली तर विद्यार्थ्यांना कित्येक फायदे आणि करिअरची भरभराट होण्याच्या शक्यता येथे आहेत.

हैदराबादमधल्या हॅकर स्कूल किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधल्या सायबर सिक्युरिटी (cyber security) कोर्समध्ये विद्यार्थी कम्प्युटर सिस्टीम आणि नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या असंख्य सिक्युरिटी फ्रेमवर्क, टूल्स आणि धोरणांबद्दल शिकू शकतात. (cyber security course in hyderabad)

(हेही वाचा – lic aao salary : LIC AAO ला किती असतो पगार? आणि काय असतं त्यांचं काम?)

हैदराबादमधल्या सायबर सिक्युरिटी कोर्सची फी

हैदराबादमधल्या सायबर सिक्युरिटी कोर्सची फी ही तुम्ही प्रवेश घेतलेल्या संस्था, अभ्यासक्रमाचा कालावधी, तुमची कौशल्याची पातळी आणि अतिरिक्त संसाधनांचा समावेश यासारख्या घटकांवर अवलंबून असते. साधारणपणे CEH, CHFI, CND आणि CPENT यांसारख्या सुप्रसिद्ध कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याला अंदाजे रु. १०,००० ते रु. १,५०,००० पर्यंत फी भरावी लागते. हे लक्षात असू द्या की, आम्ही सांगितलेल्या फीचे आकडे अंदाजे सांगितलेले आहेत. तुम्ही प्रवेश घेत असलेल्या संस्थांनुसार यात बदलही होऊ शकतात.

हा फीचा खर्च जास्त वाटत असला तरी कोर्सच्या गुणवत्तेचं मूल्यांकन आणि कोर्स करण्यासाठी वापरावी लागणारी सामग्री या सगळ्या गोष्टींचाही विचार करायला पाहिजे. तसंच या संस्थांकडून विद्यार्थ्यांना आपल्या व्यवसायाची पोचपावती आणि आफ्टर कोर्स ट्रेनिंगही दिली जाते. विश्वासार्ह आणि वेल मॅनेज्ड सायबर सिक्युरिटी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला तर या स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडण्याच्या शक्यता वाढतात. (cyber security course in hyderabad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.