couple photoshoot : जोडीदारासोबत वेडिंग पोज कशी द्यायची माहित नाही? मग हा लेख वाचा आणि रोमान्सच्या दुनियेत हरवून जा

88
couple photoshoot : जोडीदारासोबत वेडिंग पोज कशी द्यायची माहित नाही? मग हा लेख वाचा आणि रोमान्सच्या दुनियेत हरवून जा

आपल्या जोडीदाराबरोबर फोटो काढणं म्हणजे आपल्या नात्याला अधोरेखित करणं होय. त्याबरोबरच फोटो काढणं म्हणजे जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी दाखवून देण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

जोडीदाराबरोबर एक सुंदर फोटो काढायचे असतील तर, त्यासाठी तुम्हाला अनुकूल पोझेस द्याव्या लागतील. पोझेसच्या सहाय्याने तुम्ही आपल्या मनातल्या भावना मांडू शकता. तसंच एक उत्कृष्ट फोटोग्राफर त्या भावना कैद करून, तुम्हाला आयुष्यभरासाठी चांगल्या आणि रोमँटिक आठवणी जपून ठेवण्यास मदत करतो. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा काही सुंदर आणि रोमॅंटिक पोझेस सांगणार आहोत, ज्यांच्यासोबत तुम्ही आणि तुमचा जोडीदार आयुष्यभरासाठी सुंदर आठवणींचा ठेवा जपून ठेऊ शकता. (couple photoshoot)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता कधी मिळणार ? आदिती तटकरेंनी केले स्पष्ट)

१) उभं राहून केलेली पोझ

एकमेकांच्या बाजूला नुसते स्थिर उभे राहून फोटो काढण्याऐवजी तुम्ही खांद्यावर हात ठेवून किंवा हळुवार स्पर्श करून तुमचं स्ट्रॉंग बॉंडिंग पोझमधून दाखवू शकता. (couple photoshoot)

२) पाठीला पाठ लावून उभं राहणं

पाठीला पाठ लावून उभं राहणं ही पोझ जोडप्यांच्या फोटोमध्ये सर्वांत जास्त वापरली जाते. तसंच उभं राहून एकाच वेळी कॅमेराकडे पाहिलं तर खूप छान फोटो काढता येईल. ही एक क्लासिक पोझ आहे. त्यात नावीन्य आणण्यासाठी तुम्ही प्रॉप्स वापरू शकता किंवा तुमच्या आसपास असलेल्या नैसर्गिक साधनांचाही वापर करू शकता. (couple photoshoot)

३) आपल्या जोडीदाराभोवती हात गुंफणे

या पोझमध्ये उंच जोडीदार आपल्या लहान उंचीच्या जोडीदाराच्या मागून आपले हात त्यांच्या कमरेवर किंवा खांद्यावर विसावून एकमेकांत गुंफतो. तुमच्यातलं बॉंडिंग आणखी घट्ट वाटण्यासाठी पुढच्या जोडीदाराने उभ्या असलेल्या जोडीदाराचे हात हळुवारपणे धरावेत. (couple photoshoot)

४) बोटांवर किंवा चवड्यांवर उभं राहणं

ज्यावेळी जोडीदारांमध्ये उंचीचा फरक असतो त्यावेळी ही पोझ वापरली जाते. लहान उंचीची व्यक्ती आपल्या जोडीदारासमोर उभी राहते आणि त्यांच्या खांद्याला पकडून आपल्या पायांच्या चवड्यांवर किंवा बोटांवर उभी राहून त्याच्याकडे प्रेमाने पाहते. (couple photoshoot)

५) एकमेकांच्या नजरेत हरवून जाणं

एकमेकांशी नजरेने संपर्क साधणारी जोडपी ही अतिशय स्ट्रॉंग बॉण्ड शेअर करतात. हाच बॉण्ड फोटोमध्ये दाखवण्यासाठी जोडीदार एकमेकांच्या समोर उभं राहून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून ही पोझ करू शकतात. ही पोझ करताना एकमेकांच्या डोळ्यांत खोलवर हरवून जा.. एक चांगला फोटोग्राफर तुमच्या डोळ्यांतले भाव नक्कीच टिपेल. (couple photoshoot)

(हेही वाचा – bungee jumping : आता मुंबईमध्येच घेऊ शकता bungee jumping चा अनुभव! खोटं वाटतंय? तर हे वाचा…)

६) कमरेभोवती हात गुंडाळणे

एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कंबरेभोवती हात गुंडाळणे ही आणखी एक गोड पोझ आहे. आपल्या जोडीदाराला त्यांच्यामागून जवळ ओढून त्यांच्या कमरेभोवती हात ठेऊन किंवा गुंडाळून त्यांचा चेहरा पुढे वाकून पाहा. (couple photoshoot)

७) खांद्यावर डोकं ठेवून उभं राहणं.

जोडीदारांमध्ये उंचीचा फरक असेल तर ही पोझ खु सुंदर दिसू शकते. आपल्या जोडीदाराच्या खांद्यावर प्रेमाने डोकं ठेवण्याची ही पोझ नात्यातला विश्वास, प्रेम आणि दृढ संबंध दर्शवते. ही पोझ करताना कॅमेराकडे पाहण्याची गरज नाही. (couple photoshoot)

८) जोडीदारासोबत चालताना पोझ

एकत्र चालतानाचे फोटो काढणे ही एक हॅपनिंग फोटो काढण्याची छान पद्धत आहे. या पोझमध्ये वेगळेपण दाखवण्यासाठी तुम्ही अंगुलीनिर्देश करून मार्ग दाखवणं आणि कॅमेराचा अँगल बदलून दूरवरून चालत असल्याचं किंवा चालता चालता एकत्र मागे वळून पाहत असल्याचं दाखवू शकता. (couple photoshoot)

९) बसून कॅज्युअल पोझ देणे

बसून दिलेल्या पोझेस स्थिर असतात. म्हणून जोडीदारांनी आपले संबंध हे देहबोली, नजरानजर आणि प्रेमळ वर्तन यांच्या माध्यमातून अधोरेखित केले पाहिजेत. फोटोंमध्ये रोमँटिक भावना दाखवण्यासाठी पोझचं ठिकाण, वातावरण आणि पोझची बेसिक कल्पना हे सर्व महत्त्वाचं आहे. बसलेल्या पोझचे फोटो काढताना तुम्ही एकमेकांना प्रेमाने पाहणे, एकत्र मागे वळून पाहणे, खांद्यावर हात ठेवून पाठमोरा फोटो, एक व्यक्ती कॅमेराकडे पाहते आणि दुसरी व्यक्ती जोडीदाराकडे प्रेमाने पाहते किंवा कोणतीही प्रेमळ नॅचरल पोझ घेऊन बसू शकता. (couple photoshoot)

१०) रोमँटिक आणि इंटिमेंट कपल पोझ

कपल पोझ या जोडीदारांच्या नाते संबंधातला जिव्हाळा अधोरेखित करण्यासाठी असतात. क्लोज-अप फोटो काढताना जोडीदार हे एकमेकांच्या खूप जवळ असले तर त्यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं हे स्पष्टपणे अधोरेखित होतं. क्लोज-अप फोटोसाठी पोझ करताना तुम्ही एकमेकांच्या कपाळाला कपाळ लावून एकमेकांना पाहू शकता. किस पोझिशन मध्ये उभं राहून एक रोमँटिक पोझ देऊ शकता. एकमेकांना मानेला स्पर्श करू शकता. तसंच गालावर किंवा कपाळावर किस करू शकता. (couple photoshoot)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.