cordelia cruise ticket price : कॉर्डेलिया क्रूझ – महासागरातून फिरण्याचा घ्या चित्तथरारक अनुभव!

दररोज एक नवीन ठिकाण, नवं शहर पाहायला मिळणं ही कल्पनाच किती सुंदर आहे ना? पण असं खरंच घडू शकतं.

82
cordelia cruise ticket price : कॉर्डेलिया क्रूझ - महासागरातून फिरण्याचा घ्या चित्तथरारक अनुभव!

कॉर्डेलिया क्रूझ (cordelia cruise) सोबत तुमची नवनवीन शहरं फिरण्याची इच्छा पूर्ण करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही महासागरातून प्रवास करण्याचा चित्तथरारक अनुभव घेऊ शकता. हे ऐकायलाच किती एक्सायटिंग वाटतंय ना? पण हेच खरं आहे. गोवा, अंदमान, कोची, मुंबई, गणपतीपुळे, दीव आणि इतर अनेक समुद्रकिनारी वसलेल्या शहरांमध्ये काही ठराविक विलोभनीय स्थळांवर ही क्रूझ टूर सुरू असेल. कॉर्डेलिया क्रूझ ही भारतीय सागर किनारपट्टीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि तुमची सफर आरामदायी व्हावी म्हणून चांगली सर्व्हिस देण्यासाठी सज्ज आहे. कॉर्डेलिया क्रूझ ही भारतातली प्रसिद्ध क्रूझ कंपनी आहे.

या कंपनीने अलीकडेच रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल यांच्याकडून क्रूझ शिप मिळवली आहे. ही क्रूझ शिप तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. कॉर्डेलिया क्रूझ (cordelia cruise) ही भारतातली पहिली प्रीमियम क्रूझ लायनर तुमच्यासाठी अनलिमिटेड आहार, उत्कृष्ट मनोरंजन आणि आलिशान बार आणि लाउंजने भरलेले आहे. या क्रूझवर आल्यानंतर पाहुणे आणि प्रवाशांना रॉयल अनुभव मिळावा यासाठी कॉर्डेलिया क्रूझ हॉस्पिटिलिटी टीम काळजीपूर्वक सगळ्या व्यवस्था करते. महासागराच्या मधोमध असतानाही तुम्हाला कॉर्डेलिया क्रूझमध्ये बसून घरी असल्यासारखंच वाटेल.

(हेही वाचा – Mukhyamantri ladki Bahin Yojana: महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू – फडणवीस)

क्रुझवर मिळातात आकर्षक सेवा

तुमचा लांबलेला फॅमिली हॉलिडे बुक करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना या क्रूझवर सफर करायला नक्कीच आवडेल. समुद्रकिनारी वसलेल्या शहरांमध्ये मनोरंजनाची एक संपूर्ण नवीन दुनिया तुमची आणि तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. कॉर्डेलिया क्रूझमध्ये (cordelia cruise) मुंबई ते गोवा क्रूझ, मुंबई ते दीव क्रूझ, मुंबई ते लक्षद्वीप क्रूझ, चेन्नई ते मालदीव क्रूझ, चेन्नई ते गॅले कॉर्डेलिया क्रूझ आणि चेन्नई ते त्रिंकोमाली क्रूझ या पॅकेजेसचा समावेश आहे. या क्रूझवर आदरातिथ्याच्या सेवांमुळे तुम्हाला एक विलक्षण अनुभव मिळेल. या क्रूझचा प्रत्येक विभाग तुम्हाला घरगुती अनुभव देईल. तसंच याचा एक मोठा फायदा असा आहे की, तुम्हाला आपल्या देशातही आंतरराष्ट्रीय सेवा मिळेल.

ही क्रुझ (cordelia cruise) तुम्हाला चेन्नई, कोची, मुंबई, विझाग, मुरुमगाव, लक्षद्वीप तसंच आंतरराष्ट्रीय समुद्र किनाऱ्यावर श्रीलंका येथे आकर्षक सेवांचा अनुभव देते. जर तुम्ही कौटुंबिक सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असाल, तर त्यासाठी ही अतिशय योग्य संधी आहे. पूर्वी कधीही न अनुभवलेल्या सुट्टीच्या एका नव्या प्लॅनसोबत तुमच्या कुटुंबाला सरप्राईज द्या. त्यांना क्रूझवर मनोरंजनाच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जा. तुम्ही कॉर्डेलिया क्रूझवर (cordelia cruise) खर्च होणाऱ्या किमतींवर विचार करताय का? खरंतर लक्झरी सुविधा इतक्या स्वस्त नसतात. पण तरीही तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, या क्रूझची किंमत तुमच्या खिशावर जास्त भार टाकणार नाही. या क्रूझवरच्या कित्येक सुविधा अशा आहेत की, त्यांसाठी मोजलेली किंमत तुम्हाला अवाजवी वाटणार नाही. २० हजार ते ४० हजारात तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता. मात्र क्रूझची किंमत तुमचं बोर्डिंग आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी चाललात त्यावर अवलंबून असते. ही किंमत वेगवेगळी असू शकते. पण अवाजवी नक्कीच नाही. (cordelia cruise ticket price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.