Children’s Health: शहरात राहणाऱ्या मुलांना श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त, संशोधकांचे मत

15
Children's Health: शहरात राहणाऱ्या मुलांना श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त, संशोधकांचे मत
Children's Health: शहरात राहणाऱ्या मुलांना श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त, संशोधकांचे मत

शहरातील पाळणाघर, दमट वातावरणातील घरे आणि अधिक दाट वस्तीत राहणाऱ्या मुलांना श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त असतो, असे दिसून आले आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांपेक्षा शहरात राहणाऱ्या मुलांमध्ये या आजारांचे प्रमाण जास्त असल्याचे मत ‘पीडियाट्रिक पल्मोनोलॉजी’ (बाल श्वसन स्वास्थ्य विभागाने) प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. बालरोग तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

डेन्मार्कमधील कोपेनहेगन विद्यापीठाच्या निकलस ब्रस्टँड यांनी हे संशोधन सादर केले. या संशोधनात ६६३ मुले आणि त्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या. संशोधनानुसार शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांना तीन वर्षांदरम्यान १७ वेळा सर्दी, खोकला आदी श्वसनासंबंधी आजारांचा संसर्ग झाला. तर, ग्रामीण भागांतील मुलांना असा संसर्ग १५ वेळा झाला. नवजात बालकांची रक्त तपासणी आणि ही मुले चार आठवड्यांची झाल्यानंतर त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीच्या क्षमतेचे विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी ग्रामीण भागातील मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याचे दिसून आले, असे संशोधकांनी सांगितले.

(हेही वाचा – Ajit Pawar : विरोधक कारण नसनाता ट्रोल करतात, अजित पवारांनी व्यक्त केली खंत )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.