Chaturshringi Mata Temple : चतु:शृंगी मंदिराचा इतिहास

77
Chaturshringi Mata Temple : चतु:शृंगी मंदिराचा इतिहास

पेशव्यांच्या काळातल्या चतु:शृंगी मंदिराचा इतिहास सुमारे २५० वर्षांपूर्वीचा असून अतिशय समृद्ध आहे. पौराणिक कथांनुसार पुण्यातले दुर्लभशेठ पितांबरदास महाजन नावाचे रहिवासी हे एक श्रीमंत सावकार आणि टांकसाळीचे मालक होते. तसंच ते पुण्यातल्या या पवित्र चतु:शृंगी मंदिराचे मालकही होते. दुर्लभशेठ पितांबरदास महाजन हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते. ते सप्त:शृंगी देवीचे भक्त होते. दुर्लभशेठ दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीला जायचे. सप्त:शृंगीचं देऊळ पुण्यापासून ३०० किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या नाशिकजवळच्या वणी नावाच्या गावात डोंगरावर डोंगरावर आहे. (Chaturshringi Mata Temple)

कालांतराने वृद्धापकाळामुळे दुर्लभशेठ यांना देवीच्या पूजेसाठी वणीला जाणं कठीण होऊ लागलं आणि पुढे ते बंदच झालं. ते प्रवास करू शकत नव्हते, ही गोष्ट त्यांच्यासाठी अतिशय बोचरी होती. या गोष्टीचं त्यांना अतोनात दुःख झालं. पण त्यांची देवीवर असलेली निस्सिम भक्ती, देवीची सेवा न जमण्याचं दुःख आणि त्यांच्या प्रार्थना यांच्यामुळे एक दिवस सप्त:शृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली. देवीने स्वप्नांत दृष्टांत देऊन दुर्लभशेठ यांना पुण्याच्या वायव्येला जाऊन तिची मूर्ती आणण्याची सूचना केली. देवीच्या आज्ञेची पूर्तता करण्यासाठी दुर्लभशेठ पुण्याच्या वायव्य दिशेला गेले आणि त्यांना खरोखरच त्या दिशेला चमत्कारीकपणे देवीची मूर्ती सापडली.

दुर्लभशेठ यांनी देवी प्रति कृतज्ञता मानली आणि मोठ्या आनंदाने ज्या ठिकाणी त्यांना मूर्ती सापडली त्याच ठिकाणी त्यांनी मंदिराची स्थापना केली. अशा प्रकारे ही पुण्यातल्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी चतु:शृंगी मंदिराची मूळ कथा आहे. पुढे नंतर वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सध्या या मंदिराची देखभाल ‘श्री देवी चतु:शृंगी मंदिर ट्रस्ट’ यांच्याद्वारे केली जाते. (Chaturshringi Mata Temple)

(हेही वाचा – कसबा पेठे मतदारसंघातून ब्राम्हण उमेदवार द्या; Akhil Bharthiya Brahman Mahasangh कडून भाजपाकडे मागणी)

चतु:शृंगी मंदिराची वास्तुकला

डोंगरावर वसलेलं हे चतु:शृंगी देवीचं मंदिर सुमारे ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आकारमानाचं आहे. हे मंदिर चार पर्वत रांगांवर बांधलेलं आहे. त्यामुळे या मंदिराला चतु:शृंगी किंवा ‘चार शिखरे असलेला पर्वत’ असं नाव पडले आहे. चतु:शृंगी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी शंभरपेक्षा जास्त पायऱ्या चढून जावं लागतं.

याव्यतिरिक्त या मंदिराच्या आसपासच्या भागात दुर्गामातेचं आणि गणपतीचं मंदिरही आहे. गणपतीच्या मंदिरांमध्ये, डोंगराच्या चार वेगवेगळ्या टेकड्यांवर अष्टविनायकाच्या आठ लहान मूर्ती आहेत. (Chaturshringi Mata Temple)

चतु:शृंगी देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या व्यवस्थितपणे बांधलेल्या आहेत. प्रत्येक सहा पायऱ्यांनंतर विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला अनेक मुक्कामाची ठिकाणे आणि बागा दिसतील. याव्यतिरिक्त इथे डोंगरावरची चढाई सोपी जाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. येथे रात्री मुक्काम करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा आणि खानावळीही उपलब्ध आहेत.

(हेही वाचा – Sanjay Shirsat यांचा मोठा आरोप : म्हणाले, उबाठा गटात तिकीटांसाठी…)

चतु:शृंगी मंदिरात गेल्यावर काय कराल?

चतु:शृंगी मंदिराच्या सभोवतालचा परिसर मनमोहक दृश्यांनी परिपूर्ण आहे. देवीची आराधना करण्यासोबतच इथे येऊ नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवळीचा आनंद लुटता येतो. मंदिरात जाताना जर वाटेत विश्रांती घ्यायची असेल तर कोणत्याही विश्रांतीच्या थांब्यावर थांबुन स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिऊ शकता. याव्यतिरिक्त वाटेमध्ये अनेक सुंदर पुतळे आणि सुस्थितीत असलेल्या बागाही आहेत. नवरात्रीच्या दिवसांत मंदिराजवळ भव्य जत्रा भरते.

चतुश्रृंगी मंदिराची वेळ

या मंदिरात यायला कोणत्याही प्रकारचं प्रवेश शुल्क नाही. हे मंदिर जगभरातल्या सर्व भाविकांसाठी खुले आहे.

चतु:शृंगी मंदिर वर्षभर सकाळी ६.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत खुले असते. पण कधीकधी वेगवेगळ्या धार्मिक प्रसंगी आणि उत्सवांच्या वेळी ही वेळ बदलू शकते. (Chaturshringi Mata Temple)

चतु:शृंगी मंदिरात कसं जायचं?

विमानतळ – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शहरापासून फक्त १४ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी तुम्ही पुण्यातल्या कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांकडून कॅब बुक करू शकता.

रेल्वे स्थानक – शिवाजीनगर रेल्वे स्थानक हे चतु:शृंगी मंदिरापासून फक्त ४ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हे मंदिरापासूनचं सर्वांत जवळचं रेल्वे स्थानक आहे. याव्यतिरिक्त पुणे जंक्शनहूनही या मंदिरापर्यंत पोहोचता येतं. पुणे जंक्शन हे मंदिरापासून सुमारे ७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

रस्त्याने प्रवास – चतु:शृंगी मंदिरापर्यंत चांगले रस्ते जोडलेले आहेत. आजूबाजूच्या भागातून इथे मंदिरात येण्यासाठी दररोज भरपूर बसेस, टॅक्सी आणि ऑटो रिक्षा उपलब्ध असतात. (Chaturshringi Mata Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.