CA Salary in India : भारतात सीएला सरासरी किती पगार मिळतो?

CA Salary in India : सीए ही भारतातील सर्वाधिक पगार मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांपैकी एक आहे.

98
CA Salary in India : भारतात सीएला सरासरी किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

सीए किंवा सनदी लेखापाल ही भारतातील सगळ्यात प्रतिष्ठित नोकऱ्यांपैकी एक आहे. सीए पदवी मिळवल्यानंतर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करू शकता किंवा नोकरीही करू शकता. वाणिज्य शाखेतील पदवीनंतर तुम्ही सीएची परीक्षा देऊ शकता. शिवाय तु्म्हाला अकाऊंट्स, अर्थशास्त्र, कररचना, वाणिज्यविषयक कायदे आणि व्यापार शास्त्र या विषयात गती असली पाहिजे. सीए परीक्षेचा निकाल कमी लागतो. त्यामुळे देशात कायम हे काम करू शकणाऱ्यांचा तुटवडा असतो आणि सीएला नोकरी व पगारही चांगला मिळतो. (CA Salary in India)

सीए व्यक्तीला मिळणारा मोबदला हा ती व्यक्ती काम करत असलेली कंपनी आणि तुमचं कामातील कौशल्य यावर अवलंबून असतो. सीए व्यक्तींसाठी सरकारी नोकरीही उपलब्ध आहे. पण, तिथे पगार थोडा कमी असला तरी कामाचे तास ठरावीक असतात आणि सुट्ट्याही ठरलेल्या असतात. उलट खाजगी नोकऱ्यांमध्ये सीएवर जबाबदाऱ्या असतात. पण, त्या प्रमाणात पगारही मिळतो. आयसीएआय या संस्थेनं नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार भारतात सीएला मिळणारा सरासरी पगार आहे ७ ते ८ लाख रुपये वार्षिक. पण, तुम्ही काम करत असलेली कंपनी आणि तुमचा अनुभव यानुसार हा पगार वाढत जातो. (CA Salary in India)

(हेही वाचा – Sambhal मध्ये जामा मशिदीसमोर वैदिक मंत्रोच्चाराने झाले पोलीस चौकीचे भूमिपूजन)

केपीएमजी, प्राईस कूपर हाऊस, अर्न्स्ट अँड यंग आणि डेलॉईट या जगातील सर्वोत्तम चार फायनान्स कंपन्या आहेत आणि इथे अननुभवी माणसाला वर्षाला ६ ते ८ लाख रुपये मिळतात. तर ४ ते ५ वर्षांच्या अनुभवानंतर तुमचा पगार वाढून २३ लाखांच्या घरात जाऊ शकतो. सीए परीक्षेचा निकाल लागताना तुम्हाला गुणवत्ता क्रमांक मिळत असतो. परीक्षेत तुमचा कितवा क्रमांक आहे हे त्यावरून कळतं आणि तुम्ही पहिल्या ५० जणांमध्ये असाल तर देशातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्या तुम्हाला सहज चांगल्या पगारावर घेतात. (CA Salary in India)

सीएंना चांगला पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये मॅरिको, हिंदुस्थान लिव्हर, पी अँड जी या ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्या आहेत. तर टीसीएस, रिलायन्स, भारती एअरटेल, टाटा समुहही सीएंना चांगला पगार देतात. रिलायन्समधील सीएंना मिळणारा सरासरी पगार सर्वोत्तम म्हणजे वार्षिक २५ लाखांच्या घरात आहे. काही सीए आपली खाजगी प्रॅक्टिस करतात. तुम्ही किती मोठे क्लायंट आणता यावर तुमचं यश अवलंबून असतं आणि त्यानुसार, वर्षाला २५ लाख रुपये तुम्ही खाजगी प्रॅक्टिसमध्येही मिळवू शकता. जर एखादा मोठा क्लायंट तुम्हाला मिळाला तुम्ही महिन्याला ५० लाख रुपयेही मिळवू शकता. (CA Salary in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.