babulnath mandir : का आहे बाबुलनाथ मंदिर इतके प्रसिद्ध?

78
babulnath mandir : का आहे बाबुलनाथ मंदिर इतके प्रसिद्ध?

भगवान शिवाला हिंदु धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांना महादेव व देवो के देव असंही म्हटलं जातं. भगवान शिवाला समर्पित मुंबईत एक महत्त्वाचे मंदिर आहे आणि मंदिराचे नाव आहे बाबुलनाथ मंदिर (babulnath mandir). मारवाडी आणि गुजराती समाजामध्ये या मंदिराला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

कुठे आहे मंदिर?

बाबुलनाथजींचे हे मंदिर (babulnath mandir), भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीच्या उत्तरेस मलबार हिल्सच्या टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर १७.८४ किलोमीटरवर पसरलेल्या मिठी नदीजवळ आहे. नकाशावर श्री बाबुलनाथ मंदिराचे स्थान १८.९५८७ अंश उत्तरेस आणि ७२.८०८६ अंश पूर्वेस स्थित आहे.

(हेही वाचा – Jihad : नेपाळमधील बस अपघातामागे ‘जिहाद’? )

बाबुलनाथ मंदिराची रोमांचक कथा :

सुमारे ३०० वर्षांपूर्वी म्हणजेच १७०० च्या दरम्यान मलबार हिलवर एक मोठे कुरण होते. आजूबाजूची बहुतांश जमीन सोनार पांडुरंग यांच्याकडे होती. असे म्हणले जाते की सोनाराकडे अनेक गाई होत्या, ज्यासाठी पांडुरंगाने एक मेंढपाळ ठेवला होता, त्याचे नाव बाबुल होते. सर्व गायींमध्ये कपिला नावाच्या गायीने सर्वाधिक दूध दिले.

सोनाराने बाबूलला यामागचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, गवत चरल्यानंतर कपिला एका खास ठिकाणी जाऊन दूध देते. त्यावर सोनाराने आपल्या माणसांना त्या ठिकाणी खोदण्याचे आदेश दिले, त्यानंतर तेथून काळ्या रंगाचे स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले, त्यानंतर हे मंदिर मेंढपाळाच्या नावावरून बाबुलनाथ मंदिर (babulnath mandir) म्हणून ओळखले जाऊ लागले.

(हेही वाचा – Yuvraj Singh : युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक?)

बाबुलनाथ मंदिरात कसे पोहोचाल?

या ठिकाणाजवळच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याशिवाय मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोडवरुन देशातील विविध राज्यांतून लोक या मंदिरात दर्शनासाठी जातात. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गाने श्री बाबुलनाथ मंदिरापर्यंत (babulnath mandir) पोहोचता येते. या मार्गाला बाबुलनाथ मार्ग असेही म्हणतात.

बाबुलनाथ मंदिराची वास्तुकला

हे मंदिर दिसायला खूप सुंदर आहे. येथील खांब आणि भिंतींवर भव्य नक्षीकाम करण्यात आले असून ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मंदिरात विराजमान झालेली मूर्तीचे दर्शन घेतल्यावर त्या काळातील कलाकारांच्या अप्रतिम कलेचेही दर्शन होते. मंदिराच्या भिंतींवर उत्कृष्ट पेंटिंग्ज आहेत, त्यामुळे भाविकांना वेगळा नयनरम्य आनंद मिळतो. विशेष म्हणजे हे मंदिर मराठी शैलीत बांधले आहे. (babulnath mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.