Tata Steel Canteen : टाटा स्टील कँटिननने सुरू केलेली कँटिन ट्रॉली योजना काय आहे?

Tata Steel Canteen : टाटा कंपनी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी ओळखली जाते 

120
Tata Steel Canteen : टाटा स्टील कँटिननने सुरू केलेली कँटिन ट्रॉली योजना काय आहे?
Tata Steel Canteen : टाटा स्टील कँटिननने सुरू केलेली कँटिन ट्रॉली योजना काय आहे?
  • ऋजुता लुकतुके 

टाटा स्टीलची देशात आणि जगभरात मिळून २६ च्या वर कार्यालयं आहेत. आणि त्यांचे ८०,५०० कर्मचारी आहेत. टाटा समुह आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी कंपनी काळजी घेते. अशा योजनांमध्ये आधुनिकता कशी येईल यावरही संशोधन सुरू असतं. टाटा स्टीलचं कँटिंन त्यासाठीच प्रसिद्ध आहे. अलीकडेच टाटा स्टीलने आपल्या लाईम प्लांटमध्ये ट्रॉली पॉइंट सेवा सुरू केली आहे. (Tata Steel Canteen)

(हेही वाचा- Ghatkopar hoarding case मधील आरोपी भावेश भिंडेला जामीन मंजूर!)

कँटिनची सेवा सुधारण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची ठरली आहे. टाटा स्टीलच्या सर्व कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी शांतपणे जेवण्याची आणि काही क्षण विरंगुळ्याचे घालवण्यासाठी हक्काची जागा असावी, तिथे चांगलं आणि सकस जेवण तसंच विश्रामाची जागा असावी आणि सुविधा किफायतशीर असाव्यात या हेतूने ट्रॉलीपॉइंट सेवा सुरू करण्यात आली आहे. इतं कर्मचाऱ्यांसाठी फक्त ८ रुपयांत थाळी उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारी कूपन कर्मचाऱ्यांना ऑनलाईनही खरेदी करता येतात. (Tata Steel Canteen)

कँटिन ऑललाईन ॲप आणि ऑनलाईन सेवांशी जोडलेली असणं हे टाटा स्टील कँटिनचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यासाठी टाटा स्टील कँटिन ॲपही तयार करण्यात आलं आहे. आणि या ॲपच्या मदतीने कर्मचारी ञॉनलाईन थाळी बुकही करू शकतात. जेव्हा कंपनीच्या आवारात कंत्राटदार आपल्या कर्मचारी वर्गाबरोबर काम करत असताना तेव्हा या ॲपचा अधिक चांगला उपयोग होतो. कंत्राटदार आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी या ॲपच्या मदतीने आवश्यक तितकं जेवण ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. कंपनीच्या आवारात असलेल्या सगळ्यांना कँटिन आणि विश्रामगृहांची सेवा मिळावी याकडे कंपनीचा कटाक्ष आहे. (Tata Steel Canteen)

(हेही वाचा- J. J. Shootout प्रकरणातील आरोपी त्रिभुवन सिंगला ३२ वर्षांनी अटक; दाऊद टोळीने दिली होती सुपारी)

टाटा स्टील कँटिनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथला मेन्यू हा स्थानिक लोकांच्या पसंतीचा असतो. कलिंगानगर आणि नाओमुंडी या दोन कार्यालयांमधील कँटिन हे याचं चांगलं उदाहरण आहे. स्थानिक आदिवासी लोकांची आवड बघून तिथला मेन्यू ठरवला जातो. शिवाय हा मेन्यू आणि पदार्थांच्या किमती ऑनलाईन उपलब्ध असतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आधीच ऑर्डर देऊ शकता. तुमच्या वेळेला तो पदार्थ तुम्हाला तयार मिळतो. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी आणि कंपनी यांच्यात चांगलं संबंध प्रस्थापित व्हायलाही मदत मिळते. (Tata Steel Canteen)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.