Antilia House Price : मुकेश अंबानींच्या अँटिलियाची किंमत किती आहे ठाऊक आहे?

Antilia House Price : अंटिलिया हे आशियातील सगळ्यात महाग खाजगी घर आहे.

102
Antilia House Price : मुकेश अंबानींच्या अँटिलियाची किंमत किती आहे ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके

भारतातील आणि आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण मुंबईत अँटिलिया या २२ मजली इमारतीत राहतात. ही अख्खी इमारत त्यांच्या मालकीची असून आशियातील ही सगळ्यात महाग खाजगी मालमत्ता आहे. फोर्बर्सच्या यादीत मुकेश अंबानी यांची संपत्ती १२० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. जागतिक स्तरावर ते श्रीमंतांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर तर आशिया आणि भारतात अव्वल आहेत. (Antilia House Price)

मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यांनी गुजरातमध्ये जामनगर इथं आपल्या पहिल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला सुरुवात केली. आणि तिथून पुढे रिलायन्सचं साम्राज्यच भारतात उभं राहिलं. मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजचं मुख्यालय आहे. आणि धीरुभाईंचा मोठा मुलगा असलेल्या मुकेश यांनी व्यवसाय दूरसंचार आणि वित्तीय संस्थांपर्यंत वाढवला आहे. त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा आणि रिटेल क्षेत्रातही रिलायन्सने मोठी मुसंडी मारली आहे. अशा या अंबानी कुटुंबीयांचं निवासस्थान असलेलं अँटिलियाही विक्रमांचे नवीन गड सर करत आहे. (Antilia House Price)

(हेही वाचा – आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळेही महायुतीचा ऐतिहासिक महाविजय; Ramdas Athawale यांचे प्रतिपादन)

२००४ मध्ये या इमारतीचं बांधकाम सुरू झालं होतं आणि ६ वर्षांनंतर २०१० मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. मुंबईतील कंबाला हिल परिसरात अल्टामाऊंट रोडवर ४ लाख वर्गफूटांची ही इमारत उभी राहिली आहे. २७ मजल्यांच्या या इमारतीत पहिले १० मजले वाहनतळ आहेत. एकाचवेळी १६८ गाड्या एकाच वेळी पार्क होतील इतकं हे वाहनतळ मोठं आहे. शिवाय इमारतीत ५० जण बसू शकतील असं एक मिनी थिएटर आहे. गच्चीवर ३ हेलिकॉप्टर एकाच वेळी उभी राहू शकतील अशी ३ हेलिपॅड आहेत. (Antilia House Price)

पूर्ण तयार झाल्यानंतर अँटिलियाचं मूल्यांकन साधारणपणे ४.६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहेत. युकेमधील बकिंगहॅम पॅलेसनंतर जगातील सगळ्यात मौल्यवान खाजगी मालमत्ता आहे. या इमारतीच्या देखभालीवरच महिन्याला २.५ कोटी रुपये खर्च करावा लागतो. अशा या घराचा बांधकामाचा खर्च आहे तब्बल १५,००० कोटी रुपये. अँटिलिया २७ मजल्यांची असली तरी मजल्यांची उंची मोठी असल्यामुळे प्रत्यक्ष उंची ६० मजल्यांएवढी आहे. अगदी ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या लग्नातील काही सोहळे याच इमारतीत पार पडले आहेत. (Antilia House Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.