Akshay Kumar House : खिलाडू कुमार अक्षय कुमारचं मुंबईतील ड्युप्लेक्स घर आहे इतक्या कोटींचं

अक्षय कुमार मुंबईतील जुहू भागात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतो.

69
Akshay Kumar House : खिलाडू कुमार अक्षय कुमारचं मुंबईतील ड्युप्लेक्स घर आहे इतक्या कोटींचं
Akshay Kumar House : खिलाडू कुमार अक्षय कुमारचं मुंबईतील ड्युप्लेक्स घर आहे इतक्या कोटींचं
  • ऋजुता लुकतुके

पश्चिम उपनगर जुहूला मुंबईतील बेव्हर्ली हिल्स म्हणून ओळखलं जातं. कारण, सोपं आहे. अमेरिकेत लॉस एंजलीसच्या बेव्हर्ली हिल्समध्ये हॉलीवूड स्टार राहतात. तसं जुहूत बॉलिवूड स्टार राहतात. आणि मुंबईच्या या बेव्हर्ली हिल्स भागातच समुद्राच्या समोर एका इमारतीत खिलाडी कुमार अक्षय कुमारचं ड्युप्लेक्स घर आहे. कपूर घराण्याचं पृथ्वी थिएटर या घराच्या जवळच आहे. ३ मजल्यांमध्ये पसरलेल्या या घरात अक्षय आपली पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलं आरव व नितारा यांच्यासह राहतो. विशेष म्हणजे अक्षयची आई आणि बहीणही याच इमारतीत राहतात. (Akshay Kumar House)

(हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, याची संपूर्ण जबाबदारी…; Pankaja Munde काय म्हणाल्या ?)

अक्षयचं हे घर तब्बल ८० कोटी रुपये किमतीचं आहे. आणि ते सजवलंय त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने. ट्विंकल सोशल मीडियावर अनेकदा आपल्या घराचे फोटो टाकते. तिला स्वत:ला गृह सजावटीत खूपच रस आहे. घरात तळ मजल्यावर एक होम थिएटर आणि पार्टीची जागा तसंच मोठं स्वयंपाक घर आहे. इथं ट्विंकलने एक छोटंसं तळंही केलं आहे. तर आपले वडील राजेश खन्ना यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तिने चक्क एक आंब्याचं झाड लावलं आहे. तळ मजल्यावर अक्षयचा मोठा वॉकिंग वॉर्डरोबही आहे. (Akshay Kumar House)

(हेही वाचा – Paris Paralympic Games 2024 : पॅरालिम्पिक खेळांत कपिल परमारला ज्युदोमध्ये कांस्य)

वरील दोन मजल्यांवर सगळ्यांच्या बेडरुम, जिम आणि अभ्यासिका आहेत. घर अर्थातच समुद्राच्या थेट समोर आहे. आणि सगळ्या बेडरुममधून समुद्र दिसतो. अबू जानी आणि संदीप खोसला यांनी ट्विंकल खन्नाच्या पसंतीने या घराची सजावट केली आहे. या घराला एक ऐतिहासिक वारसाही आहे. कारण, अक्षय आणि कुटुंबीयं इथं राहायला येण्यापूर्वी याच इमारतीत आणि याच घरात स्वातंत्रसेनानी सुमती मोरारजी राहायच्या. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी खुद्ध गांधीजी या इमारतीत राहून गेले आहेत. आणि इथल्या हिरवळीवर त्यांनी सकाळची प्रार्थनासभाही घेतली आहे. (Akshay Kumar House)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.