Adani Green Energy : अदानी समुहातील ‘हा’ शेअर एका वर्षांत १०७ टक्क्यांनी वधारला

83
Adani Green Energy : अदानी समुहातील ‘हा’ शेअर एका वर्षांत १०७ टक्क्यांनी वधारला
Adani Green Energy : अदानी समुहातील ‘हा’ शेअर एका वर्षांत १०७ टक्क्यांनी वधारला
  • ऋजुता लुकतुके

२०२२च्या डिसेंबरमध्ये हिंडेनबर्ग अहवालाने दिलेल्या दणक्यानंतर अदानी समुहाच्या शेअरनी मागच्या वर्षभरात शेअर बाजारात चांगली उभारी घेतली आहे. समुहातील भारतीय बाजारात नोंदणीकृत सात शेअरमध्ये वर्षभरात साधारण १०० टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. या वाटचालीत आघाडीवर राहिला आहे तो अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) हा शेअर. यामुळे अदानी समुहाच्या बाजारातील भाग भांडवलातही जवळ जवळ ६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) हा एकटा शेअर गेल्या वर्षभरात १००७ रुपयांपासून थेट वर्षभरातील सर्वोच्च किंमत २,१७४ वर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये झालेली वाढ ही १०७ टक्के इतकी होती. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या रोखतेत झालेली वाढ, त्यामुळे वार्षिक महसूल आणि कंपनीच्या नफ्यात झालेली वाढ तसंच शेअरच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात सातत्याने झालेली वाढ यामुळे शेअरने ही वाटचाल केली आहे.

शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना अदानी ग्रीन एनर्जीचा (Adani Green Energy) शेअर हा नफारुपी विक्रीच्या तडाख्यामुळे सव्वा तीन टक्क्यांची घट होऊन १,९७८ रुपयांवर बंद झाला.

WhatsApp Image 2024 09 28 at 9.14.28 PM e1727538368932

शुक्रवारी जरी हा शेअर खाली आला असला तरी एकंदरीत या शेअरमध्ये वातावरण हे सकारात्मक आहे. त्यातच कंपनी टोटल एनर्जी कंपनीबरोबर ५० टक्के भागिदारीत नवीन सहकार्य करार करत आहे. त्यामुळेही येणाऱ्या दिवसांमध्ये जाणकारांचं या शेअरकडे लक्ष असेल. कंपनीच्या गुजरातमधील खावडा भागात असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात टोटल एनर्जी कंपनीला भागिदारी हवी आहे. त्या प्रकल्पावरच दोन्ही कंपन्या एकत्र काम करणार आहेत. हा सौरऊर्जा प्रकल्प १,१५० मेगावॅट क्षमतेचा आहे.

तर अदानी ग्रीन आणि टोटल एनर्जी यांचा सहकार्य करार हा एकूण ४४० दशलक्ष अमेरिकन डॉलर मूल्याचा आहे. (Adani Green Energy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.