Saree : वनस्पतीपासून बनवली साडी; जगातला पहिला प्रयोग

पेशाने इंजिनीअर असणाऱ्या गौरव आनंद यांनी टाटासारख्या अनेक नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. २०१८ साली त्यांनी 'नमामी गंगे' या मिशन अंतर्गत गंगेच्या १५०० किलोमीटरच्या पट्ट्याची स्वच्छता केली.

142

पश्चिम बंगालमधल्या एका इंजिनीअरने अनोखा विक्रम रचला आहे. पाण्यावर वाढणाऱ्या एका वनस्पतिचे तंतू काढून परिधान करता येण्यासारखी साडी गौरव आनंद यांनी बनवली आहे. जलपर्णीपासून साडी बनवण्याचा प्रयोग या आधी जगात कोणीही केलेला नाही. गौरव आनंद हे जगातील पहिले व्यक्ती आहे ज्यांनी अशाप्रकारे साडीची निर्मिती केली आहे. इतकेच नाही तर अनोख्या साडीची यशस्वी विक्री करून दाखवली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर झालेच आहे आणि सोबतच खेड्यापाड्यातल्या ४५० महिलांना रोजगार मिळाला आहे.

ध्येयाने पेटून राजीनाम दिला

पेशाने इंजिनीअर असणाऱ्या गौरव आनंद यांनी टाटासारख्या अनेक नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. २०१८ साली त्यांनी ‘नमामी गंगे’ या मिशन अंतर्गत गंगेच्या १५०० किलोमीटरच्या पट्ट्याची स्वच्छता केली. ते काम संपल्यावर त्याचे सहकारी पुन्हा ऑफिसशी जोडले गेले. पण त्यांनी राजीनामा दिला आणि २०२२ साली नद्यांच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता पुकारे फाउंडेशनची’ स्थापना केली.

पर्यावरणाला पोषक की मारक

हिरव्या रंगाची प्रत्येक वनस्पती पर्यावरणासाठी हितकारक असतेच असे नाही. साठलेल्या पाण्यावर कोणत्याही मेहनती शिवाय वाढणारी जलपर्णी पश्चिम बंगालसाठी डोकेदुखी आहे. जिथे जलपर्णी वाढते तिथल्या जलचरांचे जीवन संपुष्टात येते. त्यामुळे गौरव यांची जरपर्णी पासून साडी बनवण्याची संकल्पना पर्यावरणाच्या, रोजगाराच्या, श्वाश्वत विकासाच्या दृष्टीने हिताची आहे.

(हेही वाचा Azad Maidan Riot : तपासातील कुचराईमुळेच दंगलखोर मुसलमानांची हिंमत वाढली)

साडी बनते कशी…

  • जलपर्णी जमा गेली जाते
  • ती उन्हात आठवडाभर सुकवली जाते
  • त्याचे तंतू काढले जातात
  • गरम पाण्यात भिजवले जातात
  • त्यांना रंग दिला जातो
  • शिवण्यासाठी विणकरांकडे पाठवले जाते

saree1

ही साडी विणण्यासाठी १००% जलपर्णीच्या तंतूचा वापर केला जात नाही. त्यात काही प्रमाणात कॉटन मिसळले जाते. जर कॉटन मिसळले नाही तर साडी तकलादू होईल. २००० ते ३००० रूपये मोजल्यास ही साडी विकत घेता येईल. सध्या ही साडी फक्त जमशेदपूर आणि खारापूरला मिळते आहे.

निसर्ग, रोजगार आणि विकास

४७ वर्षीय एक विधवा त्यांच्याकडे कामाला आहे. जलपर्णीची पाने वेचून त्या सुकवण्याचे काम त्या नित्यनेमाने करतात. त्यांनी सांगितले की “पूर्वी मी एका तंबाखूच्या कारखान्यात काम करायचे. तंबाखूच्या कारखान्यात काम केल्यामुळे मला त्वचेचे रोग व्हायचे, ज्यात माझे भरपून पैसे खर्च व्हायचे. आज मी सुरक्षित वातावरणात काम करते आहे आणि दिवसाला चार – पाच तास काम करून महिन्याला ५००० रूपये कमवू शकते आहे.”

समाजाचे देणे

या नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक पुढाकराबद्दल गौरव म्हणाले की “जर मी माझा कॉर्पोरेट जॉब करता करता निवृत्त झालो असतो तर मला देशासाठी काहीच करता आले नसते. पूर्वी माझ्या पगारतून मी फक्त माझ्या कुटुंबाचे पालन करू शकायचो. आता मी अनेक कुटुबांना आर्थिक सहाय्य देऊ शकतोय.”

स्वप्न आभाळा एवढे

सध्या त्यांच्या या संकल्पनेमुळे ४५० स्त्रियांना रोजगार मिळाला आहे. हळूहळू ही संख्या वाढत जाईल असा त्यांच्या विश्वास आहे. पर्यावरणाची हानी न करता पैसे मिळवून देणाऱ्या या उपक्रमाद्वारे भविष्यात लाखभर लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.