Redditचा संस्थापक एरॉन श्वार्ट्झ ने प्रसिद्धी आणि पैसे मिळाल्यानंतरही केली होती आत्महत्या

16
Redditचा संस्थापक एरॉन श्वार्ट्झ ने प्रसिद्धी आणि पैसे मिळाल्यानंतरही केली होती आत्महत्या
Redditचा संस्थापक एरॉन श्वार्ट्झ ने प्रसिद्धी आणि पैसे मिळाल्यानंतरही केली होती आत्महत्या

तुम्ही न्यूज फीड किंवा पॉडकास्ट वापरत असाल तर यासाठी तुम्हाला एरॉन श्वार्ट्झचे आभार मानायला हवे. मात्र आज तो या जगात नाही. २६ व्या वर्षीच त्याला हे जग सोडून जावे लागले. ११ जानेवारी २०१३ रोजी त्याने आत्महत्या केली.

एरॉन श्वार्ट्झचा जन्म ८ नोव्हेंबर १९८६ रोजी झाला. तो एक प्रख्यात कंप्यूटर प्रोग्रामर होता. त्याने ऑटोमॅटिक न्यूज फीडचा शोध लावला. तो सोशल मिडिया नूज पोर्टल Reddit चा संस्थापकदेखील होता. इंटरनेटद्वारे लोकांना सर्व माहिती मोफत स्वरुपात प्राप्त व्हावी यासाठी तो आग्रही होता.

तो १० वर्षांचा असतानाच त्याने पहिला कंप्युटर प्रोग्राम तयार केला होता. १३ व्या वर्षी त्याने ऑनलाइन एन्साइक्लोपीडियाची सुद्धा निर्मिती केली होती. त्यातूनच विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा मिळाली. वयाच्या १७व्या वर्षी श्वार्ट्झ ने स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. याच कॉलेजमध्ये सोशल न्यूज वेबसाइट रेडिटचा पाया निर्माण झाला. अमेरिकन सरकारच्या स्टॉप ऑनलाइन पायरसी कायद्याच्या विरोधात आंदोलनही येथूनच सुरू झाले.

(हेही वाचा – Suspension Cold-War Treaty : नाटोकडून शीतयुद्ध करार रद्द; जगावर होणार मोठा परिणाम )

अमेरिका सरकार आणि श्वार्ट्झ यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. २००८ मध्ये श्वार्ट्झ ने पेसर या सरकारी वेबसाइटला लक्ष्य केले, ही वेबसाईट फेडरल कोर्टाच्या कागदपत्रांसाठी प्रति पृष्ठ १० सेंट आकारत होती. श्वार्ट्झने या साइटवरून १८ दशलक्ष पृष्ठे डाउनलोड केली आणि ती विनामूल्य वितरित केली. या प्रकरणात एफबीआय त्याच्याविरुद्ध काहीही करू शकली नाही.

श्वार्ट्झच्या मोफत माहिती चळवळीचा कळस म्हणजे जेक्सटर साइट हॅकिंग प्रकरण. जेक्सटर जे जुने शैक्षणिक जनरल डाउनलोड करण्यासाठी शाळांना दरवर्षी ५० हजार डॉलर्सपेक्षा जास्त शुल्क आकारले जात होते.

२०११ मध्ये श्वार्ट्झ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये लॅपटॉप घेऊन आला. त्याने तेथील विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमध्ये प्लग इन केले आणि जेक्सटरच्या साइटवरून लाखो पृष्ठे डाउनलोड केली. त्यानंतर कॅम्पस पोलिसांनी त्याला अटक केली. ११ जानेवारी २०१३ रोजी २६ व्या वर्षी त्याने आत्महत्या केली. त्याने त्याचे जीवन संपवले. मात्र तो गुन्हेगार होता की डिजिटल सामाजिक कार्यकर्ता यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे! तुम्हाला काय वाटते?

हेही पाहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.