सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज व्हावे; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांचे महत्वाचे वक्तव्य

309

भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक आहे, असे महत्वाचे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

लखनौ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सशस्त्र दलांचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’  संकल्पनेत अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे. यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्यांमधील एकात्मता वाढवण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. तसेच, सशस्त्र दलातील बदलांच्या अनुषंगाने संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करण्याच्या आणि भविष्यातील युद्धांमध्ये देशासमोरील आव्हानांसाठी तयारी करण्यावरही त्यांनी भर दिला, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.

(हेही वाचा आसाममध्ये Muslim विकत असलेल्या मासळीमुळे वाढतात किडनीचे आजार; मुख्यमंत्री सरमा यांनी दिली धक्कादायक माहिती)

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास संघर्ष आणि बांग्लादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देत संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना या घटनांचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्या आणि अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि या भागातील शांतता आणि स्थैर्याला आव्हान देणाऱ्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करून सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी (Rajnath Singh) व्यक्त केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.