INS Arighat वरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

63
INS Arighat वरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ (INS Arighat) वरून के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 3500 किलोमीटर असून विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ बुधवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती पुढे आलीय. ‘आयएनएस अरिघात’ ही देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ऑगस्टमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आयएनएस-अरिघातवरून घेण्यात आलेली के-4 क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी आहे. आतापर्यंत केवळ सबमर्सिबल पोंटून्समधून के-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात बुधवारी ही चाचणी घेण्यात आली. के-4 क्षेपणास्त्र हे घन-इंधन आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 3500 किमीपर्यंत आहे. त्याला 6 हजार टन वजनाच्या ‘आयएनएस अरिघात’ (INS Arighat) पाणबुडीतून प्रक्षेपित करण्यात आले. के-4 क्षेपणास्त्र सरावाचा एक भाग म्हणून प्रक्षेपित केले गेले. ‘आयएनएस अरिघात’वरून या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच चाचणी घेण्यात आली. यापूर्वी के-4 क्षेपणास्त्राची चाचणी केवळ सबमर्सिबल पोंटून्सवरूनच घेण्यात आली होती. आता संपूर्णपणे कार्यरत पाणबुडीतून या क्षेपणास्त्राची चाचणी घेणे हे भारतीय नौदल क्षमतेसाठी मैलाचा दगड ठरला आहे.

(हेही वाचा – शिवसेना नेते Ramdas Kadam यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, उद्धव ठाकरे कुटुंबासह…)

या क्षेपणास्त्राने त्याचे इच्छित लक्ष्य भेदले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी चाचणी परिणामांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले जात आहे. बंगालच्या उपसागरात मध्यवर्ती पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीसाठी सार्वजनिक इशारा जारी केल्यानंतर ही क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली. ही क्षेपणास्त्र चाचणी भारताच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग होती. यामुळे नौदलाची ताकद वाढली आहे.  देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ (INS Arighat) नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याने भारताचे नौदल सामर्थ्य वाढले आहे.

आयएनएस अरिघात पाणबुडीचे वजन 6 हजार टन असून, तिची लांबी 112 मीटर आहे. ‘आयएनएस’च्या आतमध्ये अणुभट्टी असून, त्यामुळे पाणबुडीला वेग मिळतो. ही पाणबुडी सागरी पृष्ठभागावर कमाल 12-15 नॉटस् (22 ते 28 किलोमीटर प्रतितास) आणि पाण्याखाली 24 नॉटस् (44 किलोमीटर प्रतितास) वेग देऊ शकते. ‘अरिघात’मध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहायक इंजिन आणि आपत्कालीन स्थितीत शक्ती आणि गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थ्रस्टर बसविले आहेत. सागरी किनार्‍यावर अतिशय शांतपणे गस्त घालणार्‍या आण्विक पाणबुडीमुळे भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे. (INS Arighat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.