“26/11 च्या मुंबई हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले नाही पण …”, S Jaishankar यांनी दिला गंभीर इशारा

88
"26/11 च्या मुंबई हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले नाही पण ...", S Jaishankar यांनी दिला गंभीर इशारा

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत (26/11 ) मोठे वक्तव्य केले आहे. ‘मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भविष्यात असा हल्ला झाला, तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल’, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

(हेही वाचा-Diwali 2024 : यंदाच्या दिवाळीत ४.२५ लाख कोटी रुपयांची बाजारात उलाढाल होण्याचा अंदाज)

मुंबईत रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, ‘जेव्हा आपण झिरो टॉलरन्सबद्दल बोलतो, तेव्हा चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा अर्थ होतो. मुंबई (Mumbai) हे केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दहशतवादविरोधी प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असताना भारताने दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच, ज्या हॉटेलमध्ये हल्ला झाला होता, तिथेच समितीची बैठक झाली होती.’ (S Jaishankar)

(हेही वाचा-संसदेच्या एकाही सल्लागार समितीमध्ये Rahul Gandhi नाही; परराष्ट्र व्यवहार समितीमधूनही बाहेर काढले)

परराष्ट्र मंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, ‘भारत जगातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. दिवसा एक काम अन् रात्री दहशतवादी कारवाया, असे आता चालणार नाही. भारत आणि चीन लवकरच लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त सुरू करतील. सीमेवरील परिस्थिती एप्रिल 2020 पूर्वीसारख होईल’, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. (S Jaishankar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.