Russia Ukraine War : रशियात ‘9/11’, युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर

220
Russia Ukraine War : रशियात '9/11', युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर
Russia Ukraine War : रशियात '9/11', युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर

रशियातील (Russia Ukraine War) सेराटोव्ह (Saratov) येथे अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला झाला. सोमवारी सकाळी 38 मजली निवासी इमारत ‘व्होल्गा स्काय’ला ड्रोन धडकले. आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. युक्रेनने हा ड्रोन हल्ला केल्याचा दावा मॉस्कोच्या गव्हर्नरने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून हे ड्रोन उडवण्यात आले.

(हेही वाचा –Aaditya Thackeray: भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने! रामा हॉटेलबाहेर तुफान राडा)

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, रशियावर 20 ड्रोन डागण्यात आले. यापैकी सर्वाधिक 9 सेराटोव्हमध्ये गोळीबार करण्यात आला. याशिवाय कुर्स्कवर 3, बेल्गोरोडस्कायावर 2, ब्रायन्स्कवर 2, तुलस्कायावर 2, ऑर्लोव्स्कायावर 1 आणि रियाझानवर 1 ड्रोन उडवण्यात आले. रिपोर्टनुसार, युक्रेनच्या लष्कराने रशियातील साराटोव्ह येथील सर्वात उंच इमारतीला लक्ष्य केले. शिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने अनेकवेळा त्यावर हल्ले केले आहेत. (Russia Ukraine War)

(हेही वाचा –शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना; Kangana Ranaut यांनी केली पोलखोल)

या हल्ल्यात इमारतीच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात इमारतीखाली उभ्या असलेल्या 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी साराटोव्हमध्ये नऊ युक्रेनियन ड्रोन पाडले आहेत. युक्रेन सीमेपासून सेराटोव्हचे अंतर 900 किमी आहे. या हल्ल्यानंतर सर्व प्रकारच्या हवाई हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. (Russia Ukraine War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.