Jammu and Kashmir: लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार! १ जवान हुतात्मा, शोधमोहीम सुरू

87
Jammu and Kashmir: लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार! १ जवान हुतात्मा, शोधमोहीम सुरू
Jammu and Kashmir: लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार! १ जवान हुतात्मा, शोधमोहीम सुरू

जम्मूतील (Jammu and Kashmir) सुंजवान कॅम्पमध्ये (Sunjwan Military Station) सकाळी 11 वाजता दहशतवाद्यांनी (terrorists) 200 मीटर अंतरावरून गोळीबार केला. सेन्ट्री पोझिशनवर तैनात असलेल्या एका सैनिकाला गोळी लागली, ज्याला नंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान ते हुतात्मा झाले. लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे.

(हेही वाचा-Bangladesh Hindu : बांगलादेशात दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना; हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पाच दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले होते. यापैकी माछिलमध्ये दोन तर तंगधारमध्ये एक दहशतवादी मारला गेला. 28-29 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा खराब हवामानात माछिल आणि तंगधारमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे लष्कराने सांगितले होते. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी येथे शोध सुरू केला. यादरम्यान चकमक सुरू झाली.

(हेही वाचा-Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?)

14 ऑगस्ट रोजी डोडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे आर्मी कॅप्टन दीपक सिंह हुतात्मा झाले. दोडा येथील आसर वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीत ते संघाचे नेतृत्व करत होते. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. 16 जुलै रोजीही डोडा येथील देसा भागात झालेल्या चकमकीत कॅप्टनसह 5 जवान हुतात्मा झाले होते. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.