Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि बारामुल्लामध्ये चकमक, 2 जवान हुतात्मा; 2 जखमी

140
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि बारामुल्लामध्ये चकमक, 2 जवान हुतात्मा; 2 जखमी
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि बारामुल्लामध्ये चकमक, 2 जवान हुतात्मा; 2 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) रॅलीपूर्वी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. किश्तवाडमध्ये 2 जवान हुतात्मा झाले आहेत. इतर 2 जवान जखमी झाले आहेत. बारामुल्ला येथे एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. किश्तवाडच्या (Kishtwar) चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) 3 दहशतवादी असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. नायब सुभेदार विपिन कुमार  (Naib Subhedar Vipin Kumar) आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग (Constable Arvind Singh) अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. (Jammu and Kashmir)

बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील चक टापर भागात रात्री 11 वाजता चकमक सुरू झाली. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. गोळीबार सुरूच आहे. किश्तवाडमध्ये लष्कर आणि पोलीस शोध मोहीम राबवत आहेत. 

कठुआमध्ये दोन दहशतवादी ठार, शस्त्रे जप्त

याआधी कठुआच्या खंडारामध्येही लष्कराचे ऑपरेशन झाले होते. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 11 सप्टेंबर रोजी उधमपूरमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. लष्कराने सांगितले की, लष्कराच्या फर्स्ट पॅरा सैनिकांना उधमपूरच्या खांद्रा टॉपच्या जंगलात २-३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. (Jammu and Kashmir)

डोडामध्ये पंतप्रधानांची सभा, 18 सप्टेंबरला किश्तवाडसह 3 जिल्ह्यांमध्ये निवडणुका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (१४ सप्टेंबर) जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे मेगा रॅलीला संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवडणूक प्रचाराची ही सुरुवात असेल. चिनाब व्हॅली, डोडा, किश्तवाड आणि रामबन या तीन जिल्ह्यांतील 8 विधानसभा जागांच्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी मतांचे आवाहन करणार आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी तिन्ही ठिकाणी मतदान होणार आहे. 

(हेही वाचा – गँगस्टर Lawrence Bishnoiला मुंबईत आणण्याच्या हालचालीला वेग)

जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर एकूण तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.