बांगलादेशात अडकलेल्यांच्या मदतीसाठी CM Eknath Shinde यांची परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्याशी चर्चा

CM Eknath Shinde : अधिकाधिक विशेष विमानांद्वारे बाधीत देशवासियांना आणणार परत मदतीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती

133
बांगलादेशात अडकलेल्यांच्या मदतीसाठी CM Eknath Shinde यांची परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्याशी चर्चा
बांगलादेशात अडकलेल्यांच्या मदतीसाठी CM Eknath Shinde यांची परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्याशी चर्चा

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते इत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले.

(हेही वाचा- Navi Mumbai Crime : नवी मुंबईच्या सिवूडमध्ये तरुणीची हत्या करून मृतदेह तलावात फेकला)

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्याशी चर्चेदरम्यान या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. बांगलादेशातील बाधित देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी दिली. बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांस, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरीत्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितरित्या परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील बाधितांना जलदगतीने मायदेशात परत आणण्यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.

(हेही वाचा- Ceropegia Shivarayina : विशाळगडावर सापडली नवी वनस्पती; शिवाजी महाराजांचे दिले नाव)

बांगलादेशातील अशांत परिस्थिती निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्वरित परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला होता. यासंदर्भात श्री. शिंदे (CM Eknath Shinde) हे परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्कात आहेत.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.